farmer saam tv
महाराष्ट्र

Pandharpur: 'महसूल' ने पेहे गावातील २२ शेतक-यांना ३९ काेटींचा ठाेठावला दंड

महसूल विभागाने नोटीस बजावल्यानंतर संबंधित शेतकरी हवालदिल झाले आहेत.

भारत नागणे

पंढरपूर : मुरुमाचे उत्खन्न करुन परस्पर विल्हेवाट लावल्या प्रकरणी पंढरपूर (pandharpur) तालुक्यातील पेहे गावातील २२ शेतक-यांना (farmers) ३९ काेटी आठ लाख सातशे रुपयांचा दंड (fine) ठाेठावण्यात आला आहे. येत्या सात दिवसांत दंडाची रक्कम भरावी अन्यथा सात बा-यावर बाेजा चढविला जाईल अशी नाेटीस संबंधित शेतक-यांना प्रशासनाने बजावली आहे. महसूल विभागाने नोटीस बजावल्यानंतर संबंधित शेतकरी हवालदिल झाले आहेत. (pandharpur latest marathi news)

सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब चव्हाण यांनी बेकायदेशीर दगड आणि मुरुम उत्खनन प्रकरणी महसूल विभागाकडे तक्रारी केली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. पेहे येथे गेल्या अनेक वर्षापासून शेतकरी शेतातून बेकायदेशीर दगडाचे उत्खनन करुन तो खडीक्रशरसाठी वापरण्यात येत असे तर मुरुम रस्त्याच्या कामासाठी वापरला जात असे असे या तक्रारीचे स्वरुप हाेते.

महसूल विभागाने संबंधित शेतक-यांच्या शेतात (farm) पंचनामे केले. त्यावेळी सुमारे ४० हजार ९९३ ब्रास दगड आणि मुरुमाचे अवैध उत्खनन केल्याचे उघडकीस आले. त्यानूसार पंढरपूरचे तहसीलदार सुशील बेल्हेकर (pandharpur tashildar sushil belhekar) यांनी संबंधित २२ शेतक-यांना दंडाची रक्कम सात दिवसांत भरावी अन्यथा जमीन महसूलाची थकबाकी म्हणून वसूल करण्यात येईल अशी नोटीस (notice) बजावली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: अजित पवार १५ हजार मतांनी आघाडीवर

Maharashtra Election Result: एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांचं काय झालं? पाहा एका क्लिकवर

Maharashtra Assembly Election Result: सुरुवातीच्या कलात काँग्रेसचे 'हे' तीन दिग्गज नेते पिछाडीवर

बिग बॉस फेम अभिनेत्रीचं सौंदर्य, पाहून काळजाचा ठोका चुकला

South Indian Star : दाक्षिणात्य कलाकारांना मुंबईची भुरळ, रश्मिका मंदानासह 'या' सेलिब्रिटींनी घेतले आलिशान फ्लॅट

SCROLL FOR NEXT