pandharpur , milk saam tv
महाराष्ट्र

Milk Adulteration Racket : सातशे किलाे पावडर जप्त; दूधात भेसळ करणा-या रॅकेटचा हाेणार भांडाफाेड

अन्न व औषध प्रशासनाच्या अहवालाची प्रतिक्षा.

भारत नागणे

पंढरपूराच दूध भेसळीचे प्रमाण मोठ्यावर वाढले आहे. त्याबाबतच्या तक्रारी सातत्याने प्रशासनाच्या कानावर येत हाेत्या. त्यावर ठाेस कार्यवाही करण्यासाठी प्रशासनाने पावले उचलली हाेती. आज (गुरुवार) पंढरपूर तालुका पाेलिसांनी दूध भेसळीसाठी वापरली जाणारी सातशे किलो संशयित पावडर ताब्यात घेतली. (Pandharpur Latest Marathi News)

पंढरपूर (pandharpur) तालुक्यातील तावशी येथे आज पहाटेच्या सुमारास दूध (milk) भेसळीसाठी वापरली जाणारी पावडर घेवून वाहन आल्याची माहिती स्थानिक ग्रामस्थांना समजली. ग्रामस्थांनी संशयित वाहन पकडून चालकाकडे चौकशी केली. त्यावेळी चालकाने दूध वाढविणारी पावडर असल्याचे ग्रामस्थांना सांगितले. (Maharashtra News)

त्यानंतर ग्रामस्थांनी वाहनासह दहा ते बारा पोती पावडर पोलिसांच्या ताब्यात दिली. पोलिसांनी चालकासह सुमारे सातशे किलो पावडर ताब्यात घेतली आहे. या प्रकाराची माहिती पोलिसांनी अन्न व औषध प्रशासन विभागास दिली आहे.

अन्न व औषध प्रशासनाने तपासणी केल्यानंतर भेसळीसाठी वापरली जाणारी पावडर आहे की अन्य काही हे समजणार आहे. पंढरपूर परिसरात मोठ्या प्रमाणावर दूधात भेसळ होत असल्याच्या तक्रारी आहेत. अन्न व औषध प्रशासनाच्या तपासणी नंतर दूध भेसळीचे मोठे रॅकेट समोर येण्याची शक्यता आहे. (Breaking Marathi News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CIDCO Lottery: नवी मुंबईत हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण होणार, सिडकोच्या ४,७७९ घरांसाठी लॉटरी, कुठे किती घरं अन् सोडत कधी निघणार?

Shiv Sena Live Update : १९ जुलैला निवडणूक आयोगाकडे कोणता पुरावा होता?; सुप्रीम कोर्टात कपिल सिब्बल यांचा आयोगाला थेट सवाल

Thigh size: जाड मांड्या असलेल्या व्यक्तींना हार्ट अटॅक येण्याचा धोका कमी?

डायबिटीजच्या रुग्णांनी जेवल्यानंतर १० मिनिटे का चालावे? कारण जाणून घ्या

Maharashtra News Live Update : घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांचा आकडा ७ वर पोहचला

SCROLL FOR NEXT