Water Scarcity Saam tv
महाराष्ट्र

Water Scarcity : आठ दिवसांपासून पाणी पुरवठा विस्कळीत; पाण्यासाठी ग्रामस्थांचा ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा

Pandharpur News : मागील वर्षी दमदार पाऊस न झाल्याने धरणात पाणी साठा होऊ शकला नाही. यामुळे सर्वत्र पाणी टंचाई जाणवली आहे. यात आता सोलापूर जिल्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या टेंभुर्णीत तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे

भारत नागणे

पंढरपूर : यंदाच्या उन्हाळ्यात पाणी टंचाईची भीषणता अधिक प्रमाणात जाणवली आहे. आता पावसाळ्याला सुरवात झाली असली तरी अद्यापपर्यंत दमदार पाऊस झालेला नाही. यामुळे अजूनही पाण्याची भिषणता जाणवत आहे. यात सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णी गावात मागील आठ दिवसांपासून पाणी पुरवठा विस्कळीत झाला असल्याने संतप्त ग्रामस्थांनी आज ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा काढला. 

मागील वर्षी दमदार पाऊस न झाल्याने धरणात पाणी साठा होऊ शकला नाही. यामुळे सर्वत्र पाणी टंचाई जाणवली आहे. यात आता सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या टेंभुर्णीत तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ग्रामपंचायतीच्या ढिसाळ नियोजनामुळे पाणी टंचाई निर्माण झाली आहे. जवळच असलेल्या उजनी धरणातून पाणी पुरवठा केला जातो. परंतु ग्रामपंचायतीच्या ढिसाळ नियोजनामुळे गेल्या दहा दिवसांपासून ग्रामस्थांना पाणी टंचाईला सामोरो जावे लागत (Water scarcity) असल्याचा आरोप येथील सामाजिक कार्यकर्ते सुरज देशमुख यांनी केला आहे.

टेंभुर्णी हे गाव पुणे- हैद्राबाद या राष्ट्रीय महामार्गावर असून येथे मोठी औद्योगिक वसाहत देखील आहे. तरी येथे ऐन पावसाळ्यात पाणी टंचाई निर्माण झाल्याने ग्रास ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते सुरज देशमुख यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायतीवर महिलांचा घागर मोर्चा काढण्यात आला. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO: पीएफ खातेदारांसाठी मोठा दिलासा! 7 लाखांचे मोफत विमा संरक्षण कायम, नव्या नियमांमुळे मिळणार आणखी लाभ

मोठी बातमी! चंद्रशेखर बावनकुळे मुख्यमंत्री होणार, खासदाराच्या दाव्याने खळबळ

Maharashtra News Live Update: 'भाजपमुक्त राम'च्या नाऱ्यावर शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला!

आता WhatsApp मुळे बर्थडे डेट सहज लक्षात राहणार; असे वापरा WhatsAppचे नवे फिचर

Blood Pressure Control: औषधांशिवाय वाढलेला बीपी नियंत्रणात आणायचाय? या 7 टीप्स करा फॉलो

SCROLL FOR NEXT