Chandrabhaga River Flood  Saam tv
महाराष्ट्र

Chandrabhaga River Flood : अवकाळी पावसाचा हाहाकार; पंढरपुरातील ब्रिटिश कालीन पुलासह पाच बंधारे पाण्याखाली, चंद्रभागेतील मंदिरानाही वेढा

Pandharpur Heavy Rain : सततच्या पावसामुळे पंढरपुरात चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहत आहे. पंढरपूरच्या चंद्रभागा नदीवरील जुना ब्रिटिश कालीन दगडी पुलासह पाच बंधारे हे पाण्याखाली गेले आहेत

भारत नागणे

पंढरपूर : राज्यात अवकाळी पावसाने हाहाकार माजविला आहे. रविवारी दुपारनंतर राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस झाला आहे. या पावसामुळे पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यानुसारच पंढरपूरसह परिसरात मुसळधार पाऊस झाला आहे. यामुळे चंद्रभागा नदीला मोठा पूर आला असून नदीमधील पुंडलिक मंदिरासह इतर मंदिरांना वेढा पडला आहे. तसेच ब्रिटिश कालीन दगडी पुलासह पाच बंधारे पाण्याखाली गेले आहेत. 

पंधरवाड्यापासून सातत्याने अवकाळी पाऊस होत आहे. मे महिन्यात कधी पडला नाही इतका पाऊस यंदाच्या उन्हाळ्यात झाला आहे. यामुळे प्रचंड नुकसानीची झळ बसल्याचे पाहण्यास मिळत आहे. यातच रविवारी दुपारनंतर तर पावसाने हाहाकार माजविला आहे. दरम्यान सततच्या पावसामुळे पंढरपुरात चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहत आहे. पंढरपूरच्या चंद्रभागा नदीवरील जुना ब्रिटिश कालीन दगडी पुलासह पाच बंधारे हे पाण्याखाली गेले आहेत. यामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. 

पंढरपुरात पूर सदृश्य परिस्थिती 

चंद्रभागेच्या वाळवंटातील पुंडलिक मंदिरासह इतर मंदिरांना आहे आणि संपूर्ण वाळवंटाला देखील पाण्याने वेढा दिला आहे. चंद्रभागा नदी ४५ हजार क्युसेक्स इतक्या क्षमतेने प्रवाहित होत आहे. तर पूर सदृश्य परिस्थिती पंढरपुरात निर्माण होत आहे. अनेकदा आषाढी यात्रेच्या वेळी भाविकांना चंद्रभागेत स्नान करण्यासाठी पाणी नसते. मात्र यंदा उन्हाळ्यातच चंद्रभागा नदीला मोठा पूर आल्याचे पाहण्यास मिळत आहे. 

उजनी धरण सात टक्क्यांनी वधारले
सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असणाऱ्या उजनी धरणात बारा तासात चार टीएमसी पाण्याची वाढ झाली आहे. तर धरण सात टक्क्यांनी वधारलेला आहे. रविवारी संध्याकाळी सहा वाजता उजनी धरणात ५५ टीएमसी पाणी होते. तर आज सकाळी सहा वाजता धरणात ५९ टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. सध्या उजनी धरणात दौंड येथून १८ हजार क्युसेक्य इतका विसर्ग सुरु आहे. तर रात्रभरात उजनी धरण क्षेत्रात आठ मिलीमीटर इतका पाऊस झाला आहे. त्यामुळे उजनी धरण सततच्या पावसामुळे लवकरच वजाक्षमतेतून प्लस मध्ये येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Home Vastu Tips: उकळते दूध वारंवार उतू जाणे हे कशाचे लक्षण आहे?

Maharashtra Tourism: लोणावळा-खंडाळाही पडेल फिकं! मालेगावपासून अगदी हाकेच्या अंतरावर आहे 'हे' हिल स्टेशन

Maharashtra Live Update: मनोज जरांगे पाटील यांना अचानक आली चक्कर

मतदान केलं त्यांनी निधी मागायचा नाही; मंत्री पंकजा मुंडेंची कुणाला तंबी?

Kishtwar Cloudburst: ६० जणांचा मृत्यू, २०० बेपत्ता; जेवणासाठी मोठी रांग, किश्तवाडमध्ये ढगफुटीनंतर भयावह वास्तव

SCROLL FOR NEXT