Pandharpur News Saam tv
महाराष्ट्र

Pandharpur News : पुत्रदा एकादशीनिमित्त पंढरपुरात दोन लाख भाविक

Pandharpur News : अयोध्येत २२ जानेवारीला रामलल्ला प्राणप्रतिष्ठापनेचा सोहळा साजरा होत आहे. या आनंदाच्या दिवशी विठुरायाचे दर्शन व्हावे; या भावनेने लाखो भाविक आजच पंढरीत दाखल झाले

भारत नागणे

पंढरपूर : प्रभू श्रीरामाची अयोध्येत प्रतिष्ठापना होत असून सर्वत्र उत्साहपूर्ण वातावरण आहे. या दरम्यान आज पुत्रदा एकादशी आणि रामलल्ला प्राण प्रतिष्ठापनेच्या निमित्ताने आज (Pandharpur) पंढरपुरात सुमारे दोन लाख भाविक दाखल झाले आहेत. (Breaking Marathi News)

अयोध्येत २२ जानेवारीला रामलल्ला प्राणप्रतिष्ठापनेचा सोहळा साजरा होत आहे. या आनंदाच्या दिवशी विठुरायाचे दर्शन व्हावे; या भावनेने लाखो भाविक आजच पंढरीत दाखल झाले आहेत. चंद्रभागा आणि संत नामदेव पायरीजवळ आज भाविकांनी गर्दी केली. (Putrada Ekadashi)  पुत्रदा एकादशी वर्षातून एकदाच येते. त्यामुळे वारकरी संप्रदायामध्ये या एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यातच रामलल्ला प्राणप्रतिष्ठापना सोहळा असल्याने पंढरीत भाविकांची मांदियाळी पाहायला मिळत आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दर्शनासाठी लांब रांग  

विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शनाची रांग गोपाळपूर रोडवरील (Vitthal Mandir) पत्राशेडपर्यंत गेली‌ आहे. विठुरायाच्या पदस्पर्श दर्शनासाठी सहा तासाहून अधिक वेळ लागत आहे. तसेच मुखदर्शनासाठी ही एक तासाचा अधिक वेळ लागत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शहापूर बसचा भीषण अपघात, 8 ते 10 प्रवासी जखमी

Tulsi Plant Vastu: सुकलेली तुळस काय संकेत देते? घरातील झाडे सुकण्याचा अर्थ काय?

DA Hike : कर्मचाऱ्यांची दिवाळीत चांदी! पगार वाढणार, 'या' राज्यात DA मध्ये थेट 8% वाढ

Gold Rate Today: गणेशोत्सवात सोन्याचे दर पुन्हा घरसले, आज सोनं खरेदीची सुवर्णसंधी; 18k- 22k आणि 24k चे दर किती?

Sonam Maskar: कोल्हापूरच्या लेकीचा देशासाठी ‘अचूक निशाणा’; सोनमने आशियाई नेमबाजीत पटकावलं रौप्यपदक, वडिलांच्या संघर्षाचंही झालं चीज

SCROLL FOR NEXT