Sina River Flood Saam tv
महाराष्ट्र

Sina River Flood : माढ्यात सीना नदीने धोक्याची पातळी ओलांडली; नदीकाठच्या १८ गावांना महापुराचा वेढा, दीड हजार नागरिकांचे स्थलांतर

Pandharpur News : सीना नदीपात्रातून जवळपास दोन लाख क्युसेक इतका विसर्ग सुरू आहे. सीनानदीकाठच्या गावांमध्ये पुराची गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. हजारो हेक्टर क्षेत्रावरील पिके पाण्याखाली गेली.

भारत नागणे

पंढरपूर : सोलापूर जिल्ह्यात सातत्याने होत असलेल्या मुसळधार पावसामुळे सीना नदीला मोठा पूर आला आहे. सीना नदीला महापूर आल्यामुळे माढा व करमाळा तालुक्यातील जवळपास अठराहून अधिक गावांना पुराच्या पाण्याचा वेढा पडला आहे. यामध्ये अनेक घरांमध्ये पाणी शिरले असल्याने जवळपास दीड हजारहुन अधिक लोकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे. 

सोलापूर जिल्ह्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे मागील तीन- चार दिवसांपासून सीना नदीला पूर आला आहे. पाऊस थांबत नसल्याने नदीला आलेल्या पुराचे प्रमाण देखील कमी होत नसल्याने पाहण्यास मिळत आहे. परिणामी आजूबाजूच्या परिसरात पुराचा मोठा फटका बसत आहे. यात माढा तालुक्याला सर्वाधिक फटका बसला असल्याने माढा तालुक्यात पाच हजार कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज आहे. 

१८ गावांना मोठा फटका 

सीना नदीला महापूर आल्यामुळे माढा तालुक्याला मोठा आर्थिक फटका बसला आहे. महापुरामुळे हजारो हेक्टर क्षेत्रावरील पिके पाण्यात गेल्याने शेतीचे नुकसान झाले आहे. यामध्ये सुमारे ५००० कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. तर महापुरामुळे १७ ते १८ गावांना याचा मोठा फटका बसला आहे. राहुल नगर या गावांमध्ये अनेक नागरिक अडकले आहेत. येथील नागरिकांना तत्काळ सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी एअरलिफ्ट करावे लागणार आहे. त्यासाठी प्रशासनाने हेलिकॉप्टरची सोय करावी.

हेक्टरी 50 हजार रुपयांची तातडीची मदत जाहीर करावी

सीना नदीला आलेल्या महापुरामुळे माढा तालुक्यातील १८ गावातील शेतकऱ्यांची शेती उध्वस्त झाली आहे. यामध्ये हजारो हेक्टर क्षेत्रावरील ऊस, द्राक्ष, केळी, मका, बाजरी आदि पीकं वाहून गेली आहेत. १०० वर्षाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच असा अकराळ विक्राळ महापूर सीना नदीला आला आहे. सरकारने पंचनामे करण्यापूर्वी सरसकट हेक्‍टरी ५० हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर करावी; अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांनी केली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अमरावती शहरात मतदारसंख्येत मोठी वाढ

Kitchen Hacks: कांद्यावर काळे डाग येऊ नये म्हणून करा हे सोपे उपाय

Famous Actress : मुलीसाठी बापाने हद्द पार केली; लोकप्रिय अभिनेत्रीचं केलं अपहरण, धमकी दिली अन्..., वाचा नेमकं प्रकरण

LIC Vima Sakhi : LIC ची जबरदस्त योजना! महिलांना दर महिन्याला मिळणार ₹७०००, अट फक्त १०वी पास

Weather Forecast: आजचे हवामान! ५ राज्यांना पावसाचा इशारा, तर १८ शहरावर दाट धुक्याचे सावट, महाराष्ट्रात काय स्थिती?

SCROLL FOR NEXT