Chandrayaan 3 Sangola Connection Saam Tv
महाराष्ट्र

Chandrayaan 3 News: कौतुकास्पद! चांद्रयान- 3 मोहिमेत सांगोला तालुक्यातील तरुणाचंही योगदान

Sangola News: कौतुकास्पद! चांद्रयान- 3 मोहिमेत सांगोला तालुक्यातील तरुणाचंही योगदान

भरत नागणे

Chandrayaan 3 Sangola Connection: चांद्रयान मोहिमेमध्ये सांगोला तालुक्यातील एका उद्योजकाचे मोठे योगदान असल्याचे समोर आले आहे. या उद्योजकाने पुरवलेल्या सिल्वर आणि कॉपर पासून तयार केलेल्या ट्यूबचा वापर या चांद्रयानामध्ये करण्यात आला आहे.

या ट्यूबमुळे चांद्रयानाचे वजन कमी होण्यास मदत झाली आहे. शिवाय चांद्रयानाला वेळोवेळी देण्यात आलेले सिग्नल देखील व्यवस्थित पोहोचण्यास मदत झाली आहे. अत्यंत गरीब परस्थिती मधून आलेल्या शेखर भोसले या उद्योजकाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

चांद्रशेखर भोसले यांचे बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे चांदीपासून इलेक्ट्रिक उपकरणे बनवण्याचा व्यवसाय आहे. गेल्या अकरा वर्षांपासून ते इस्त्रोला चांदी आणि कॉपर पासून बनवलेली विविध उपकरणे पुरवतात. (Latest News Update)

चांद्रयान मोहिमेत देखील काॅपर आणि चांदी पासून बनवलेल्या 50 ट्युब तयार करून त्या इस्त्रोला दिल्या आहेत. त्या सर्व ट्युबचा वापर चांद्रयानामध्ये करण्यात आला आहे. शेखर भोसले हे मूळचे सांगोला तालुक्यातील खवासपूर गावचे आहेत. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण हे सांगोल्यात झाले आहे.

आजही त्यांचे आई-वडील व बंधू खवासपूर गावात शेती करतात. मोहीम यशस्वी होत असल्याने सांगोला तालुक्यात शेखर भोसले यांचे कौतुक केले जात आहे. सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांनीही शेखर भोसले यांच्या या कामगिरीचे कौतुक केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sukanya Samriddhi Yojana: ₹1.5 लाख गुंतवा अन् ₹71.82 लाख मिळवा! जाणून घ्या कन्या सुकन्या समृद्धी योजनेचे गणित

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये व्हीएलसीसी संस्थेविरोधात मनसेचे ठिय्या आंदोलन

Nitin Gadkari : नितीन गडकरी राजकारणातून निवृत्त होणार का? कालच्या त्या वक्तव्यावर थेट ऑफिसमधून स्पष्टीकरण

पूर्ण फी भरली, तरी प्रशिक्षण नाही! VLCC विरोधात मनसेचा धडक मोर्चा

BJP News: भाजपमधील अंतर्गत गटबाजी उफाळली; तावडेंना मुंबई अध्यक्षांनी थेट सुनावलं, नगरसेवकांनाही आरसा दाखवला

SCROLL FOR NEXT