Pandharpur News Saam tv
महाराष्ट्र

Shahaji Bapu Patil News : उद्धव ठाकरे यांनी आत्मचिंतन करून खऱ्या शिवसेनेत यावे; शाहजी बापू पाटील

Pandharpur News : अलीकडेच उध्दव ठाकरे यांनी पक्षातील ऊटगोईंवर बोलताना मी आता धक्का पुरूष झालोय; असे वक्तव्य केले होते. त्यावर शहाजी बापू पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला

भारत नागणे

पंढरपूर : उद्धव ठाकरे यांना कुणीही धक्का देत नाही. उद्धव ठाकरे यांची वर्तवणूकच त्यांना धक्का देत आली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी स्वतःबाबत आत्मचिंतन करावे आणि खऱ्या शिवसेनेसोबत यावे; असा सल्ला शिवसेना शिंदे गटाचे सांगोल्याचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी आज येथे बोलताना दिला आहे.

अलीकडेच उध्दव ठाकरे यांनी पक्षातील ऊटगोईंवर बोलताना मी आता धक्का पुरूष झालोय; असे वक्तव्य केले होते. त्यावर शहाजी बापू पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. तर संजय राऊत यांनी गंगेत स्नान केले, तर गंगा मैली होईल; अशा शब्दात शहाजी बापू पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार टिका केली आहे.

संजय राऊत यांच्यावर साधला निशाणा 

काँग्रेस सोबत ठाकरे यांना सत्ता स्थापन करायला लावणाऱ्या संजय राऊत यांच्याकडून हिंदुत्वाची अपक्ष करणे चुकीचे आहे. त्यामुळे संजय राऊत यांनी कुंभमेळ्यात गंगेच्या स्नानाला जाऊ नये. संजय राऊत यांनी प्रयागराजमध्ये कुंभमेळ्यामध्ये स्नान केले तर गंगा मैली होऊन जाईल. त्यामुळे ही घाण इथच नारळाच्या झाडाखाली राहू द्या. गंगेत घाण घेऊन जाऊ देऊ नका; अशी टिका ही  माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी केली.

नीलम गोऱ्हे या शिवसेनेच्या जुन्या नेत्या आहेत. घडत असणाऱ्या गोष्टी पाहिल्याशिवाय त्या कोणते चुकीचे विधान करणार नाहीत. यामुळे नीलम गोऱ्हे मर्सिडिज बाबत असे विधान करणार नाहीत; असं शहाजी पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

दांडिया सुरू असताना कॉलेजमध्ये अनर्थ! लोखंडी सांगाडा कोसळून तरुणीचा मृत्यू, १७ विद्यार्थी जखमी, हादरवणारा व्हिडीओ

Nagpur Fort : विदर्भाची काशी! नदीच्या काठावर वसलाय ऐतिहासिक खजिना, सुट्टीत करा 'या' किल्ल्यावर भटकंती

Bigg Boss 20 : बिग बॉसमध्ये मोठा ट्विस्ट! अचानक बाजी पलटली, 'या' स्पर्धकाचा पत्ता कट

Morning Walk Benefits: रोज सकाळी काही मिनिटं मारा फेरफटका, होतील 6 आश्चर्यकारक बदल

SCROLL FOR NEXT