Poshan Aahar Saam tv
महाराष्ट्र

Poshan Aahar : पोषण आहार खाल्ल्याने मुलांना उलट्या, जुलाब; पंढरपुरात निकृष्ट दर्जाचा शालेय पोषण आहार

Pandharpur News : गोरगरिबांची मुले शिकणाऱ्या शाळेत दिला जाणारा पोषण आहार निकृष्ट दर्जाचा असल्याचं पंढरपूर मधील घटनेने पुन्हा समोर आले आहे. याचा मुलांना त्रास होऊ लागल्याचे आता समोर आले आहे

भारत नागणे

पंढरपूर : मध्यान्ह भोजन योजनेंतर्गत शाळेतील मुलांना दुपारच्या वेळी शालेय पोषण आहाराचे वाटप करण्यात येत असते. मात्र हा आहार निकृष्ट दर्जाचा असल्याचे वारंवार समोर आले आहे. असाच प्रकार पंढरपूरमध्ये समोर आला आहे. येथिल शाळांमधील मुलांना वाटप करण्यात आलेला आहार निकृष्ट दर्जाचा देण्यात आला. हा आहार खाल्ल्याने शाळेतील दहा मुलाला उलट्या व जुलाबाच्या त्रास झाल्याचे समोर आले आहे. 

शाळांमध्ये पुरवठा करण्यात येत असलेले शालेय पोषण आहाराचे धान्य खराब व निकृष्ट दर्जाचे असल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. याबाबत पालकांकडून तक्रारी करण्यात आल्यानंतर देखील यात सुधारणा होत नसल्याचे चित्र आहे. यानंतर गोरगरिबांची मुले शिकणाऱ्या शाळेत दिला जाणारा पोषण आहार निकृष्ट दर्जाचा असल्याचं पंढरपूर मधील घटनेने पुन्हा समोर आले आहे. याचा मुलांना त्रास होऊ लागल्याचे आता समोर आले आहे. 

मुलांना उलट्या, जुलाबाचा त्रास 
पंढरपूरमध्ये शालेय पोषण आहार खाल्ल्याने १० मुलांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास झाल्याची घटना घडली आहे. माध्यान्ह भोजन योजनेत मुलांना शाळेत खिचडीचे वाटप करण्यात आले होते. हि खिचडी मुलांनी खाल्ली. यानंतर काही वेळाने दहा मुलाला त्रास जाणवू लागला होता. उलट्या व जुलाबाचा त्रास होऊ लागल्याने मुलांना उपचारासाठी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. 

बचत गटांवर कारवाईची मागणी 

शालेय पोषण आहार निकृष्ट दर्जाचा विद्यार्थ्यांना दिला जात असल्याचे या प्रकारावरून समोर आले आहे. शाळेतील मुलांना अर्धवट शिजलेले व अस्वच्छ तांदूळ, उग्र वास, अस्वच्छता यामुळे हा प्रकार घडल्याची शक्यता आहे. या प्रकरणी शालेय पोषण आहार पुरवठा करणाऱ्या बचत गटावर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : दोन महिन्यांच्या मुलीला आईच्या कुशीतून पळवलं, पालकांना शेतात सापडला मृतदे; नेमकं काय घडलं?

मुंबईत BCCIच्या ब्रॉडकास्ट इंजिनिअरचा संशयास्पद मृत्यू; IPLसाठी आला होता भारतात|VIDEO

Sunetra Pawar : सुनेत्रा वहिनींनी मुख्यमंत्रिपदी विराजमान व्हावं, आई एकविरा चरणी राष्ट्रवादीच्या आमदाराचं साकडं

8th Pay Commission: २०२६ की २०२७; कधी होणार आठवा वेतन आयोग लागू? केंद्र सरकारने स्पष्टच सांगितलं

Maharashtra Live News Update: छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑटो एलपीजी पंपासमोर ३ ते ४ किलोमीटरच्या रांगा

SCROLL FOR NEXT