Ashadhi Wari 2024
Ashadhi Wari 2024 Saam tv
महाराष्ट्र

Ashadhi Wari 2024 : संत ज्ञानेश्वर महाराजांचा २९ जूनपासून पालखी सोहळा; आळंदी येथून पंढरपूरकडे होणार प्रस्थान

भारत नागणे

पंढरपूर : आषाढी वारीची वारकरी आतुरतेने वाट पाहत असतात. यंदाच्या वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी (Ashadhi Ekadashi) असून यंदाच्या आषाढी सोहळ्यासाठी संत ज्ञानेश्वर महाराजाचा पालखी सोहळा २९ जूनला पंढरपूरकडे (Pandharpur) प्रस्थान करणार आहे. १७ जुलैला आषाढी एकादशीचा सोहळा साजरा होणार आहे. (Maharashtra News)

आषाढी यात्रेसाठी (Ashadhi Wari) वारकरी वाट पाहत असतात. मंदिर समितीकडून यासाठीची तयारी केली जात असते. या अनुषंगाने आषाढी यात्रा नियोजनासाठी परंपरेप्रमाणे आज पंढरपूर येथील माऊली मठात संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याची बैठक संपन्न झाली. या बैठकीत संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे प्रमुख योगी निरंजनाथ यांनी याबाबत माहिती दिली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

२१ जुलैला परतीचा प्रवास 

संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी २९ जून रोजी आळंदी येथून पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. तर १७ जुलै रोजी पंढरपुरात एकादशीचा सोहळा होईल. चार दिवसांच्या मुक्कामानंतर आषाढीचा सोहळा संपल्यानंतर २१ जुलैला पालखी सोहळा आळंदीच्या प्रवासाला निघणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashi Bhavishya: बुधवार या राशींसाठी खास, जाणून घ्या तुमच्या नशिबात आज काय लिहलंय

Horoscope Today : 'या' राशींच्या लोकांची होणार भरभराट, तुमची रास?

Mahrashtra Election: 26 मतदारसंघात मतदानाचा टक्का घसरला; मतदानाची वाढ आणि घट कोणाच्या पथ्यावर ?

19 स्पीकर्स, 8 एअरबॅग्ज आणि माईल्ड माइल्ड हायब्रिड इंजिन; Audi Q7 Bold Editio भारतात लॉन्च

Maharashtra Election: संथगतीनं मतदानावरून राजकारण तापलं; मुख्यमंत्री शिंदेंचे चौकशीचे आदेश

SCROLL FOR NEXT