Madha Vidhan sabha Saam tv
महाराष्ट्र

Madha Vidhan sabha : माढ्यात तिरंगी लढत; महायुतीकडून मीनल साठे यांना उमेदवारी

Pandharpur News : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी आता जोर धरू लागली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटचा टप्पा येऊन ठेपला आहे.

भारत नागणे

पंढरपूर : विधानसभा निवडणुकीसाठी अजूनही काही मतदारसंघात उमेदवाराचा शोध सुरु आहे. यात माढा मतदारसंघात उमेदवार शोधानंतर महायुतीला अखेर उमेदवार मिळाला आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवार म्हणून माढ्याच्या नगराध्यक्ष मीनल साठे यांना उमेदवारी मिळाली आहे. बबन शिंदे यांचा मुलगा अपक्ष मैदानात उतरणार आहे. तर शरद पवार यांनी अभिजित पाटील यांन उमेदवारी दिली आहे.

विधानसभा निवडणुकीची (Vidhan Sabha Election) रणधुमाळी आता जोर धरू लागली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटचा टप्पा येऊन ठेपला आहे. मात्र अनेक ठिकाणी उमेदवार निवडीचा पेच असल्याने शोध सुरूच आहेत. यातीलच माढा या मतदारसंघात महायुतीकडून (Mahayuti) उमेदवार शोध सुरु होता. यानंतर अखेर उमेदवाराचा शोध पूर्ण झाला असून मीनल साठे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 

माढा मतदारसंघात अजित पवार यांना उमेदवार मिळत नव्हता अशी चर्चा होती. मात्र सरते शेवटी अजित पवार यांनी माढा तालुक्यातील जुना मातब्बर गट असणाऱ्या माजी आमदार धनाजी साठे यांच्या स्नुषा मिनल साठे यांना उमेदवारी देऊ केली आहे. आमदार यशवंत माने यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचा ए बी फॉर्म मीनल साठे यांना दिला. यानंतर आज साठे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यानंतर माढा मतदारसंघात आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार अभिजीत पाटील व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार मीनल साठे आणि अपक्ष उमेदवार रणजीत शिंदे यांच्यात लढत होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुरंदरमध्ये शिक्षकांचे धरणे आंदोलन; विविध मागण्यांसाठी शासनाविरोधात घोषणाबाजी

Lakshmi Niwas: 'लक्ष्मी निवास'मध्ये मोठा ट्विस्ट! लक्ष्मी-श्रीनिवासचे घराचे स्वप्न पूर्ण; तर जयंतचा होणार अखेर पर्दाफाश

Weekly Insulin: भारतात नवं इन्सुलिन लाँच! रोज नाही तर आठवड्यातून एकदाच घ्या इंजेक्शन, किंमत किती?

पावसाळ्याचा फिरायला जायचा प्लॅन करताय? पण, मुंबई-पुण्याजवळील 'ही' प्रसिद्ध पर्यटनस्थळे ३१ ऑगस्टपर्यंत राहणार बंद

Today Gold Rate : सुवर्णनगरीत सोन्याला झळाळी, चांदीलाही चकाकी; पाहा आजचे ताजे दर

SCROLL FOR NEXT