Kartiki Mahapuja Pandharpur: Saamtv
महाराष्ट्र

Pandharpur News: उपमुख्यमंत्र्यांना विरोध, कार्तिकी महापूजा जरांगे पाटलांच्या हस्ते व्हावी.. मराठा क्रांती मोर्चाची मागणी

Kartiki Mahapuja Pandharpur: कार्तिकी महापुजेला दोन्ही उपमुख्यमंत्र्यांपैकी कोणाला बोलवायचे असा मोठा प्रश्न मंदिर समितीसमोर उभा आहे.

भारत नागणे

Pandharpur News:

कार्तिकी महापुजेला दोन्ही उपमुख्यमंत्र्यांपैकी कोणाला बोलवायचे असा मोठा प्रश्न मंदिर समितीसमोर उभा आहे. अशातच ही कार्तिकी महापुजा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या पत्नीच्या हस्ते व्हावी.. अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाकडून करण्यात आली आहे. मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक रामभाऊ गायकवाड यांनी ही मागणी केली आहे. (Maratha Reservation News)

याबाबत सविस्तर माहिती अशी की, कार्तिकीची विठ्ठलाची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते केली जाते. यावेळी मात्र दोन उपमुख्यमंत्री असल्याने महापूजेला कोणाला निमंत्रण द्यायचे असा पेच मंदिर समितीपुढे झाला आहे. अशातच सकल मराठा समाजाने मात्र उपमुख्यमंत्र्यांचा हस्ते करण्यात येणाऱ्या शासकीय महापूजेला विरोध केला आहे.

महापूजेचा पेच सोडविण्यासाठी मनोज जरांगे पाटील‌ (Manoj Jarange Patil) यांच्या हस्ते ही महापूजा करावी‌ अशी मागणी पुढे आली आहे. मराठा क्रांती मोर्चाचे (Maratha Kranti Morcha) राज्य समन्वयक रामभाऊ गायकवाड यांनी ही मागणी केली आहे. यावर आता मंदिर प्रशासन काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान, राज्यात दोन दोन उपमुख्यमंत्री असल्याने कार्तिकी महापुजेला कोण येणार याबद्दल आता चर्चा रंगल्या आहेत. यामध्ये अजित पवार यांचे (Ajit Pawar) नाव आघाडीवर आहे. यंदाच्या कार्तिकी महापुजेला उपमुख्यमंत्री अजित पवार येणार असल्याचे बोलले जात आहे. परंतु याबाबतीत मंदिर प्रशासनाने अद्याप कोणताही खुलासा किंवा स्पष्टीकरण दिले नाही. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : अनिल परब घेणार देवेंद्र फडणवीस यांची भेट, नेमकं कारण काय?

Maharashtra Politics : माणिकराव, तुमच्यामुळे सरकारची बदनामी होतेय, अजित पवारांकडून राजीनाम्याचे संकेत

Sanjay Dutta Education: शिक्षण अर्धवट सोडले अन् अभिनयाचे गिरवले धडे; संजय दत्त किती शिकलाय?

Nashik To Akkalkot: गुड न्यूज! ६ राज्यांमधून जाणार महामार्ग, नाशिक ते अक्कलकोट ४ तासांत पोहचता येणार; ही शहरं येणार जवळ

Akkalkuwa News : प्रसूतीसाठी झोळीत टाकून पायपीट; रस्त्याअभावी रुग्णालयात पोहचणे अशक्य, माघारी फिरत घरीच प्रसूती

SCROLL FOR NEXT