Jayant Patil Saam tv
महाराष्ट्र

Jayant Patil : पूरग्रस्तांना दसऱ्यापूर्वी २५ हजार रूपयांची तातडीची मदत द्यावी; जयंत पाटील यांची मागणी

Pandharpur News : तालुक्यातील लोंढेवाडी, वाकाव, उंदरगाव भागात नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करून पूरग्रस्त शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधला यानंतर माध्यमाशी बोलताना सरकारकडे मदतीची मागणी

भारत नागणे

पंढरपूर : सीना नदीच्या महापुरामुळे माढा तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी ५० हजार रुपये आर्थिक नुकसान भरपाई द्यावी. तर दसरा- दिवाळी सण तोंडावर आहे. यामुळे सरकारने दसऱ्यापूर्वी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी २५ हजार रुपयांचा पहिला हप्ता तातडीने द्यावा; अशी मागणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी केली आहे. 

सोलापूर शहरात मुसळधार पाऊस होत असल्याने सीना नदीला महापूर आला आहे. सीना नदीला आलेल्या पुरामुळे माढा तालुक्यात प्रचंड नुकसान झाले आहे. तालुक्यातील नुकसान झालेल्या लोंढेवाडी, वाकाव, उंदरगाव या भागात नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करून पूरग्रस्त शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी माध्यमांशी बोलताना जयंत पाटील यांनी सरकारने केवळ पाहणी करू नये तर शेतकर्यांना वेळेवर मदत देण्यासाठी प्रयत्न करावा; असे सांगितले.  

मदत करा; यात कोणतेही राजकारण करणार नाही  

मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून या शेतकऱ्यांना सरकारने मदत द्यावी. आज तरी आम्ही या विषयी कोणतेही राजकारण करणार नाही. पण सरकराने ही शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेतली पाहिजे. एनडीआरएफची मर्यादा एवढीच आहे; हे शेतकऱ्यांना सांगू नये. राज्य आणि केंद्र सरकारने मिळून मदत करावी.

कर्जमाफी करण्याची हीच योग्य वेळ 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नेहमी सांगतात, की योग्य वेळी शेतकऱ्यांना कर्जमाफी आम्ही देऊ. आता शेतकरी कर्जमाफी करण्याची हीच योग्य वेळ आहे. कर्जमाफी संदर्भात सरकारने तातडीने निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी करावी. याशिवाय शेतकऱ्यांना नवीन कर्ज देण्यासाठी बँकांना तातडीने आदेश द्यावेत; अशी मागणी ही आमदार जयंत पाटील यांनी यावेळी केली. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune: घरासमोर खेळताना चिमुकलीवर कुत्र्यांचा हल्ला, फरफटत नेत शरिराचे लचके तोडले; थरकाप उडवणारा VIDEO

Maharashtra Live News Update: - - अवघ्या १२ तासांत दोन हत्यांच्या घटनेनं नाशिक हादरलं

Shantanu Moghe: प्रिया नेहमी म्हणायची की…', प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेने व्यक्त केल्या भावना

Sameer Wankhede : समीर वानखेडे भडकले! शाहरुख खान, नेटफ्लिक्सवर मानहानीचा खटला, २ कोटींची केली मागणी

Ajit Pawar: अजित पवारांना महिलांचा वेढा; आम्हाला 1500 रुपये नको, रस्ता द्या|VIDEO

SCROLL FOR NEXT