Pandharpur News Saam tv
महाराष्ट्र

Pandharpur News : गोपाळपुरात दर्शनासाठी पैशांचा बाजार; पैसे न दिल्याने प्रवेश नाकारल्याचा व्हिडीओ आला समोर

Pandharpur News : येथे आलेला भाविक गोपाळपुरात श्रीकृष्ण मंदिरातील संत जनाबाईचा संसार पाहण्यासाठी आवर्जून जातात

भारत नागने

पंढरपूर : पंढरपूरच्या गोपाळपूर येथील प्रसिद्ध गोपाळपूर कृष्ण मंदिरात दर्शनासाठी पुजारी भाविकांकडून (Pandharpur) पैसे घेत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पैसे न दिल्याने महिला पुजार्याने दर्शनासाठी मंदिरात प्रवेश नाकारला आहे. या संदर्भातील एक व्हीडिओ सोशल मिडियात व्हायरल झाला आहे. (Live Marathi News)

कार्तिकी एकादशी (Kartiki Ekadashi) निमित्ताने भाविक पंढरपुरात येत आहेत. कार्तिकी यात्रेमुळे पंढरपुरात भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ लागली आहे. येथे आलेला भाविक गोपाळपुरात श्रीकृष्ण मंदिरातील संत जनाबाईचा संसार पाहण्यासाठी आवर्जून जातात. परंतु येथे जाणाऱ्या भाविकांकडून याकरिता पैसे  आहेत. पैसे घेवून दर्शनासाठी (Kartiki Yatra) सोडले जात असल्याने देवाच्या दारात स्थानिक पुजाऱ्यानी पैशाचा बाजार मांडल्याने भाविकंमधून तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तर मंदिरात प्रवेश नाकारतात 

पंढरपुरात दर्शनासाठी आलेले भाविक गोपाळपूर येतात. मात्र येथे आलेल्या भाविकांकडून जबरदस्तीने पैसे घेतले जातात. पैसे नाही दिले तर चक्क मंदिरात प्रवेश नाकारला जातो अशी‌ धक्कादायक माहिती समोर आली आहे. असा एक व्हवीडीओ देखील समोर आला आहे. यापूर्वी असे अनेकदा प्रकार घडले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पिंपरी चिंचवडमध्ये भाजपाला धक्का! बड्या नेत्याची नाराजी उघड; थेट राजीनामाच दिला

Manoj Jarange Patil Protest Live Updates : मुंबईतील मराठा आंदोलकांसाठी नगरमधून 12 टन फरसाण रवाना

Satara : ग्रामसभेत तुंबळ हाणामारी; रोजगार हमी योजनेच्या लाभार्थ्यांवरून वाद

Maratha Reservation : मराठा आंदोलनाच्या लढ्यात अजित पवारांचा आमदार उतरला; सरकारला दिला घरचा आहेर, मोजक्या शब्दात केली पोलखोल

Maratha Protest: मराठा आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आंदोलकाचा अनोखा प्रयोग; आझाद मैदानात आणला ‘बादशाह’ रेडा|VIDEO

SCROLL FOR NEXT