Vitthal Rukmini Mandir Saam tv
महाराष्ट्र

Vitthal Rukmini Mandir : विठ्ठल रुक्मिणी चरणी १६ लाखाचा सोन्याचा हार अर्पण; विठ्ठल मंदिर दर्शनासाठी खुले होताच ओघ सुरु

Pandharpur News : पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिर मागील अडीच महिन्या पासून बंद होते. मात्र २ जूनपासून हे मंदिर नव्या रूपात भाविकांसाठी खुले केले आहे.

भारत नागणे

पंढरपूर : तब्बल अडीच महिन्यानंतर विठ्ठल- रूक्मिणी मंदिर दर्शनासाठी खुले झाले आहे. यामुळे पुरातन मंदिराचा लुक पाहण्यासाठी आणि विठुरायाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढली आहे. यासोबतच देणगी देखील वाढू लागली असून आज हवेली तालुक्यातील एका भाविकाने १५ लाख ९१ हजार किंमतीचे दोन सोन्याचे हार विठ्ठल आणि रूक्मिणी मातेला अर्पण केले.

पंढरपुरातील (Pandharpur) विठ्ठल रुक्मिणी मंदिर मागील अडीच महिन्या पासून बंद होते. मात्र २ जूनपासून हे मंदिर नव्या रूपात भाविकांसाठी खुले केले आहे. मंदिराला ७०० वर्षाचे पुरातन रूप देण्यात आले आहे. मंदिराचे मूळ रूप पाहण्यासाठी देशभरातून भाविक पंढरीत येत आहेत. (Vitthal Rukmini Mandir) दर्शनासाठी येणारे भाविक विठ्ठल चरणी देणगी देत असतात. आता भाविकांची गर्दी वाढल्याने विठ्ठलाच्या देणगीत देखील वाढ होऊ लागली आहे. 

या दरम्यान आज हवेली तालुक्यातील देणगीदार बबन तुपे यांनी विठ्ठल व रुक्मिणी मातेच्या चरणी १५ लाख ९१ हजार किमतीचे दोन हार (Gold) अर्पण केले. यावेळी बबन तुपे यांचा सत्कार मंदिर समितीचे सदस्य  ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर व कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा व उपरणे देऊन करण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Farmer Scheme: आनंदी आनंद! कर्जमाफीनंतर शेतकरी, शेतमजुरांसाठी राज्य सरकारनं घेतला महत्त्वाचा निर्णय

पुढील २० तासात महाराष्ट्रासह २५ राज्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट; ताशी ७५ किमी वेगाने वाहणार सोसाट्याचा वारा

गणेशोत्सवात 12 दिवस ड्राय डे! मद्यविक्रीला कुठे राहणार बंदी?

MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व प्रमुख मागण्या मान्य; सरकारनं घेतले तीन मोठे निर्णय

देवाभाऊंच्या घरी जरांगेभाऊ जाणार, अमृता फडणवीसांकडून जरांगेंना जेवणाचं आमंत्रण

SCROLL FOR NEXT