Chandrabhaga River Flood  Saam tv
महाराष्ट्र

Pandharpur : पंढरपुरात चंद्रभागा दुथडी; मंदिरांना पाण्याचा वेढा, पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता

Pandharpur News : उजनी धरणातून ७५ हजार तर वीर धरणातून नीरा नदीमध्ये ५४ हजार क्युसेक इतका विसर्ग सुरू आहे. संध्याकाळपर्यंत पंढरपुरात विसर्ग पोचून पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तविली आहे

भारत नागणे

पंढरपूर : उजनी आणि वीर धरणातून भीमा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे पंढरपुरातील चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. आज सकाळी पंढरपुरातील चंद्रभागा नदीमध्ये २२ हजाराहून अधिक क्युसेक इतका विसर्ग सुरू आहे. चंद्रभागा नदीपात्रातील भक्त पुंडलिक मंदिरासह इतर साधुसंतांच्या समाधीना पाण्याने वेढा दिला आहे. तर जूना दगडी पूल पाण्याखाली गेला आहे.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरु आहे. मुसळधार पावसामुळे नदी- नाल्यांना पूर आल्यामुळे अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यानुसार उजनी व वीर धरण पाणलोट क्षेत्रात देखील मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने धरणात पाण्याची आवक वाढली आहे. परिणामी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याने चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहत आहे. यामुळे पंढरपुरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. 

मंदिरांना पुराचा वेढा 

चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहत असल्याने पंढरपुरातील चंद्रभागा नदीच्या तीरावरील मंदिरांना पुराचा वेढा पडला आहे. नदीपात्रातील भक्त पुंडलिक मंदिरासह इतर साधुसंतांच्या समाधीना पाण्याने वेढा घातला असल्याने येथे भाविकांना दर्शनासाठी जाता येणे शक्य नाही. शिवाय पंढरपुरात आलेल्या भाविकांना देखील चंद्रभागा स्नान करण्यासाठी बंदी करण्यात आली आहे. 

पाण्याचा विसर्ग आणखी वाढणार 

आज दुपारपर्यंत पंढरपुरात पाण्याची पातळी आणखी वाढण्याची शक्यता आहे. प्रशासनाने नदीकाठच्या सर्व गावांना व स्थानिक नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. सध्या उजनी धरणातून ७५ हजार तर वीर धरणातून नीरा नदीमध्ये ५४ हजार क्युसेक इतका विसर्ग सुरू आहे. आज संध्याकाळपर्यंत पंढरपुरात तो विसर्ग पोचून चंद्रभागा नदी परिसरामध्ये पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

धिंड आरोपींची, कारवाई पोलिसांवर; मानवाधिकार आयोगाच्या निर्णयावर पुणेकर संतप्त

NEET पेपरफुटी प्रकरणी एकापेक्षा एक खळबळजनक खुलासे, CBI च्या चार्जशीटमध्ये नेमके काय?

Mumbai Local Train : रेल्वे प्रवाशांनो, रविवारी वेळापत्रक बघूनच बाहेर पडा; मध्य रेल्वेवर फास्ट ट्रेनचे थांबे बदलणार, हार्बरवर काही लोकल रद्द

Bollywood Actor Hospitalized: ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेत्याची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया

Maharashtra News Live Update: जळगावात दहावीच्या विद्यार्थ्यावर चॉपरने प्राणघातक हल्ला

SCROLL FOR NEXT