Heavy Rain
Heavy RainSaam tv

Heavy Rain : मुसळधार पावसाने पिके आडवी; शेतांमध्ये पाणी साचल्याने मोठे नुकसान

Sambhajinagar Rain News : मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून पूरस्थिती निर्माण झाल्याने शेतांमध्ये देखील पाणी साचले आहे. यामुळे शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे
Published on

राज्यभरात काही दिवस दडी मारलेल्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पावसाला सुरवात झाल्याने अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. अतिवृष्टी होऊन सर्वत्र पाणीच पाणी साचत असल्याने शेतांमध्ये देखील पाणी साचले आहे. तर नदी- नाल्यांना पूर आल्याने हे पाणी शेतात शिरल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यात शेतकऱ्याचे मोठा फटका बसला आहे. 

फळबागांचे मोठे नुकसान 

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सलग तीन दिवस झालेल्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांची उभी पिके आडवी झाली आहेत. फळबागाही या पावसामुळे मोडल्या आहेत. काही ठिकाणी पाणी साचल्याने झाडे कोलमडून पडली आहेत. पळशी गावातील अर्जुन पळसकर या डाळिंब फळबाग उत्पादक शेतकऱ्याच्या डाळिंब फळबागेचे मोठ नुकसान झाले. डाळिंबाची झाडे पूर्ण जमीनदोस्त झाले. त्यामुळं शेतकऱ्यांना ती झाडे काढून टाकण्याची वेळ आली आहे. पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी; अशी मागणी करण्यात येत आहे.

Heavy Rain
Nashik Rain Update : नाशिक जिल्ह्यात पावसाची संततधार; जिल्ह्यातील १४ धरण ओव्हर फ्लो

कपाशीसह खरीप पिकांचे नुकसान 

जालन्यातील घनसावंगी तालुक्यातील वडी रामसगावसह परिसरात मुसळधार पाऊस झाला आहे. यामुळे शेतात पाणी साचल्याने कपाशीसह खरीप पिकाचं अतोनात नुकसान झाले आहे. वडी रामसगाव येथील शेतकरी राज जाधव यांची तब्बल दोन एकर कपाशीचे पीक पाण्याखाली गेले आहे. मागील चार दिवसांपासून सतत घनसावंगी तालुक्यामध्ये पाऊस पडत असल्याने अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी साचून खरिपातील पिके खराब होऊ लागली आहे. 

Heavy Rain
Vasai Flood : वसईच्या बैठ्या चाळीत पुरात अडकले नागरिक; ३० जणांची सुखरूप सुटका

कांदा उत्पादक शेतकऱ्याचे मोठे नुकसान
धाराशिव : धारावीच्या परंडा तालुक्यामध्ये पावसाने शेतकऱ्याचं मोठं नुकसान केले आहे. गेल्या अकरा दिवसापासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे नदीच्या प्रवाहामध्ये कांदा पीक वाहून गेले आहे. जमीन ही वाहून गेल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.  तात्काळ पंचनामे करून नुकसानीची भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com