Car Accident In Shahaji Bapu Patil Convoy Saam TV
महाराष्ट्र

Shahaji Bapu Patil: मोठी बातमी! शहाजी बापू पाटील यांच्या ताफ्यातील गाडीचा अपघात, एकाचा जागीच मृत्यू

Accident News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजित शिबिरासाठी गेले होते.

भारत नागणे

Pandhaurpur News: सांगोल्याचे(Sangola) शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांच्या ताफ्यातील पोलिस गाडीला अपघात झाला आहे. सांगोला तालुक्यातील नाजरा गावा जवळ आज दुपारी अपघात झाला आहे. अपघातामध्ये एक जण जागीच ठार झाला आहे तर एक जण गंभीर जखमी आहे. (Accident)

याबाबत अधिक माहिती अशी की, आमदार शहाजी बापू पाटील सांगोला तालुक्यातील नाजरा येथे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजित शिबिरासाठी गेले होते. शिबिराचा कार्यक्रम संपल्यानंतर ते सांगोला शहराकडे येत असताना त्यांच्या वाहनाच्या पुढे पोलीस गाडीचा ताफा होता. त्यातील एका गाडीचा आणि मोटार सायकलचा भीषण अपघात झाला.

या भीषण अपघातात एक जण जागीच ठार झाला तर एकाची प्रकृती चिंताजनक आहे. सांगोला पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद झाली करण्यात आली आहे. दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले गेले आहे. असाच कार्यक्रम करुन येताना हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. (Shahaji Bapu Patil)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: सिगारेट, पैशांच्या बॅगा आणि मंत्री शिरसाट; संजय राऊतांचा व्हिडीओ पोस्ट करत मोठा गौप्यस्फोट

मराठी-हिंदी वादात ब्रिजभूषण सिंहांची उडी,ठाकरेंना थेट धमकी

गौरवास्पद! UNESCO च्या यादीत पुण्यातील तीन किल्ल्यांचा समावेश | VIDEO

Government Scheme : मुलांसाठी सरकारची नवी योजना? मुलांना महिन्याला 3 हजार?

Sleeping Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार झोपण्याची योग्य दिशा कोणती?

SCROLL FOR NEXT