Pandharpur Vitthal Mandir Saam tv
महाराष्ट्र

Pandharpur Vitthal Mandir : विठ्ठल मंदिरातील पेशवेकालीन सभामंडपाला चकाकी; नव्याने पॉलिश करत दुरुस्तीचे काम

Pandharpur News : पंढरपूरच्या विठ्ठल- रुक्मिणी मंदिराच्या जतन आणि संवर्धनाचे काम सुरू आहे. विठ्ठल मंदिरातील गाभाऱ्याचे काम पूर्ण झाले आहे.

भारत नागणे

पंढरपूर : पंढरपूरचे विठ्ठल मंदिर प्रातां मंदिरापैकी एक आहे. याच विठ्ठल मंदिरातील पेशवे कालीन लाकडी सभा मंडपाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आहे. सागवान लाकडाच्या या सभामंडपाला पॉलिश केल्याने मंडप आता चकाकू लागला आहे.

पंढरपूरच्या (Pandharpur) विठ्ठल- रुक्मिणी मंदिराच्या जतन आणि संवर्धनाचे काम सुरू आहे. विठ्ठल मंदिरातील गाभाऱ्याचे काम पूर्ण झाले आहे. तर नुकतेच विठ्ठल मंदिरातील (Vitthal Mandir) सुमारे दीडशे वर्षांपूर्वीच्या लाकडी सभा मंडपाच्या दुरूस्तीचे काम देखील आता पूर्ण झाले आहे. संपूर्ण सभा मंडपाला नव्याने पाॅलीश करण्यात आली आहे. त्यामुळे मंदिरातील या मुख्य सभामंडपाला चकाकी आली आहे.

आषाढीचे सर्व कार्यक्रम येथेच 

मंदिरातील पेशवाई लाकडी सभा मंडप हा मंदिराचे वैभव मानले जाते. हा लाकडी सभा मंडप १६ खांबावर उभारण्यात आला आहे. १५० फूट उंच आणि ५० फूट रुंदीच्या संपूर्ण लाकडी सभा मंडपाच्या दुरूस्तीचे काम अवघ्या ४० दिवसांत पूर्ण झाले आहे. (Ashadhi ekadashi) आषाढी यात्रेसाठी भजन, किर्तन याबरोबरच मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम देखील याच सभा मंडपात होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: भंडारा भीषण अपघातात आणखी एका महिलेचा मृत्यू, मृतकाचा आकडा पोहोचला ९ वर

राजकारणात मोठा भूकंप! भाजपने सोडली बंडखोर खासदारांची साथ; स्वबळावर निवडणुका लढण्याचा निर्णय

Weightloss : १५ दिवस काहीच खाल्लं नाही तर इतकं होईल वजन कमी, वेळीच व्हा सावध नाहीतर...

Home Loan : दरवर्षी १ लाख एक्स्ट्रा भरल्याने होम लोन किती लवकर फेडता येईल? पाहा संपूर्ण कॅल्क्युलेशन

PM SVANidhi Scheme : फेरीवाल्यांसाठी मोठी बातमी! मोदी सरकार देणार कर्जासोबत ३० हजारांपर्यंत क्रेडिट कार्ड; जाणून घ्या नेमकी काय आहे योजना?

SCROLL FOR NEXT