पंढरपूर : महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठ्ठलाच्या आषाढी वारीची (Ashadhi Wari) जागतिक वारसा स्थळामध्ये नोंद (Pandharpur) होणार आहे. यासाठी केंद्र सरकारच्या सांस्कृतिक विभागाने पुढाकार घेतला आहे. तसा प्रस्ताव युनेस्कोकडे पाठवला जाणार आहे. इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्राच्यावतीने ही माहिती दिली आहे. (Tajya Batmya)
तुकाराम महाराजांचे वंशज नारायण महाराज यांनी १६८५ मध्ये पालखी सोहळा सुरू केला. त्यानंतर १८३२ मध्ये हैबत बाबा महाराज यांनी संत ज्ञानेश्वर महाराजांचा स्वतंत्रपणे आळंदी पंढरपूर पालखी सोहळा सुरू केला. ही वारीची परंपरा आजही सुरू आहे. सुरवातीला काही मोजक्या वारकऱ्यांच्या समवेत निघणाऱ्या पालखी सोहळ्यात आता लाखो लोक सहभागी होतात. ना निमंत्रण...ना निरोप असं काही नसताना या पालखी सोहळ्यात लाखो लोक सहभागी होतात.
दोन– तीन महिन्यात प्रस्ताव
पंढरीच्या वारीचा इतिहास तेराव्या शतकाच्या आधीपासून ज्ञात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीनिमित्त आळंदी व देहूपासून पंढरपूरपर्यंत २५० कि.मी. अंतराच्या आषाढी वारीत लाखो लोक विठुरायाच्या ओढीने पंढरीची वाट चालतात. वारीची परंपरा जागतिक पातळीवर पोचावी यासाठी केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्राच्या माध्यमातून अध्ययनपर चित्रीकरण पूर्ण केले आहे. याशिवाय वारीशी संबंधित सर्व साहित्य एकत्रित करण्यात येत असून पुढच्या दोन ते तीन महिन्यांमध्ये प्रस्ताव युनेस्कोला पाठविण्यात येणार आहे. केंद्र शासनाने घेतलेल्या या निर्णयाचे विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर व संत ज्ञानेश्वर महाराज व पालखी सोहळ्याचे प्रमुख विकास ढगे पाटील यांनी स्वागत केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.