Pandhapur News Saam tv
महाराष्ट्र

Pandhapur News : पंढरपुरात ठाकरे गटाकडून विठ्ठलाची आरती; विधानसभा अध्यक्षांना सुबुद्धी देण्याचे साकळे

Pandharpur News : आमदार अपात्रतेच्या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. निकाल काय असेल याची उत्सुकता सर्वांना लागलेली आहे. शिवसेना ठाकरे गट व शिंदे गटातील आमदारांचे देखील देव पाण्यात आहेत.

भारत नागणे

पंढरपूर : आमदार अपात्रता प्रकरणाचा आज निकाल आहे. हा निकाल जाहीर करताना विधानसभा (Pandharpur) अध्यक्षांना निकाल देताना विठुरायाने सुबुद्धी द्यावी; यासाठी आज ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी विठ्ठल मंदिरासमोर (Vitthal Mandir) विठुरायाची आरती केली. (Tajya Batmya)

आमदार अपात्रतेच्या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. निकाल काय असेल याची उत्सुकता सर्वांना लागलेली आहे. (Shiv Sena) शिवसेना ठाकरे गट व शिंदे गटातील आमदारांचे देखील देव पाण्यात आहेत. यामुळेच आमदार अपात्रता निकालाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर येथे ठाकरेंच्या युवासेनेने विठ्ठलाची महाआरती केली आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शिवसेना युवासेनेचे नेते रणजित बागल म्हणाले की विधानसभा अध्यक्षांकडुन राज्यातील जनतेला सत्य निर्णयाची अपेक्षा आहे. राज्यात लोकशाही आहे का? याचे भविष्य ठरवणारा आजचा निकाल आहे. विधानसभा अध्यक्षांनी योग्य व सत्य निकाल द्यावा ही सुबुद्धी देखील त्यांना मिळावी याकरिता आम्ही आज महाराष्ट्रातील जनतेचे आराध्य दैवत भगवंत पांडुरंगाची महाआरती केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

श्रीगुरू पादुका दर्शन महोत्सवाची उत्सुकता शिगेला; स्वामी स्वरुपानंदांच्या हस्ते शनिवारी उद्घाटन

खुशखबर! WhatsAppचं भन्नाट फीचर! App डाउनलोड न करता आता करा थेट चॅट

Maharashtra Live News Update: साकीनाक्यात हिट अँड रन; अल्पवयीन मुलाचा मृत्यू

Kolhapur : केस ओढले, गळा आवळला, लाथाबुक्यांनी मारलं; घराच्या वाटणीवेळी तुंबळ हाणामारी|Video Viral

महामार्गावर भीषण अपघात; ओव्हरटेक करताना बस आणि ट्रकची समोरासमोर धडक, ५ जणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT