Kartiki Ekadashi Saam tv
महाराष्ट्र

Kartiki Ekadashi : विठुरायाचे आजपासून २४ तास दर्शन सुरू; कार्तिक यात्रेनिमित्ताने विठ्ठल मंदिर समितीचा निर्णय

Pandharpur News : यंदा १२ नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशीचा सोहळा आहे. आषाढी एकादशीनंतर येणाऱ्या कार्तिकी एकादशीला देखील भाविक मोठ्या संख्येने पंढरपुरात दाखल होत असतात.

भारत नागणे

पंढरपूर : पंढरपूरच्या विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी भाविक आषाढी व कार्तिकी एकादशीला जात असतात. यामुळे पंढरपुरात भाविकांची गर्दी होत असते. या गर्दीत भाविकांना विठुरायाचे दर्शन चांगले घेता यावे; या अनुषंगाने आजपासून विठुरायाचे २४ तास दर्शन खुले करण्यात आले आहे.  

यंदा १२ नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशीचा (Kartiki Ekadashi) सोहळा आहे. आषाढी एकादशीनंतर येणाऱ्या कार्तिकी एकादशीला देखील भाविक मोठ्या संख्येने पंढरपुरात (Pandharpur) दाखल होत असतात. विठुरायाच्या दर्शनासाठी भाविकांच्या मोठ्या रांगा लागत असतात. यामुळे दर्शनासाठी तासनतास रांगेत उभे रहावे लागते. भाविकांची हि गैरसोय थांबावी व विठ्ठलाचे दर्शन लवकर घेता यावे; यासाठी विठ्ठल मंदिर समितीने विठ्ठल दर्शन २४ तास सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.  

आजपासून २० नोव्हेंबरपर्यंत विठ्ठलाचे 24 तास दर्शन सुरू असणार आहे. या काळात विठ्ठलाचे सर्व राजोपचार बंद करण्यात येत असतात. तर विठ्ठलास केवळ नित्यपूजा , गंधाक्षता आणि लिंबू पाणी देण्यात येत. तसेच विठ्ठलाचा पलंग काढून विठ्ठलाच्या पाठी मऊ मुलायम लोड देत २४ तास दर्शन परंपरेप्रमाणे सुरू करण्यात आले. यामुळे भाविकांसाठी सोयीचे होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पतीचं निधन, दुसऱ्या लग्नासाठी आईनं १० हजारांना मूल विकलं? नातवंडासाठी जीव तीळ तीळ तुटणाऱ्या आजीचा आरोप

Sansad Ratna Award 2025 : महाराष्ट्रातील ७ खासदारांनी दिल्लीत नाव गाजवलं; सुप्रिया सुळे, वर्षा गायकवाड यांच्यासह निशिकांत दुबेंनाही संसदरत्न पुरस्कार

Best Indian Patriotic Movies: या विकेंडला बघा देशभक्ती जागवणारे हे ७ चित्रपट

Maharashtra Live News Update: कोल्हापुरातील काँग्रेस कमिटीमध्ये काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा

Jasprit Bumrah Retirement : टीम इंडियाला मोठा हादरा! जसप्रीत बुमराह कसोटीतून निवृत्ती घेणार?

SCROLL FOR NEXT