Pandharpur News  saam tv
महाराष्ट्र

Viral News : दारूच्या नशेत २१ वर्षीय तरुणाने भीमा नदीत मारली उडी; अद्याप सापडला नाही

एका २१ वर्षीय तरुणाने दारूच्या नशेत दुथडी भरून वाहणाऱ्या भीमा नदीत उडी मारली आहे.

भारत नागणे

Pandharpur news : पंढरपूरमध्ये (Pandharpur) २१ वर्षीय तरुणाला दारू पिणं चांगलंच महागात पडलं आहे. पंढरपूरच्या भीमा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. त्यामुळे भीमा नदी दुथडी भरून वाहत आहे. एका २१ वर्षीय तरुणाने दारूच्या नशेत दुथडी भरून वाहणाऱ्या भीमा नदीत उडी मारली आहे. त्यानंतर हा तरुण बेपत्ता झाला आहे. त्यामुळे त्याच्या कुटुंबातील सदस्यांना मोठा धक्का बसला आहे. या प्रकरणी तालुका ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गजेंद्र उर्फ सज्जन गायकवाड (रा.धोंडेवाडी ता.पंढरपूर) असं या नदीत उडी मारलेल्या तरूणाचे नाव आहे. गजेंद्र गायकवाड आणि भारत गायकवाड हे चुलते पुतणे हे आज सकाळी करकंब येथे पाहुण्याकडे गेले होते. दुपारी परत येत असताना गजेंद्र गायकवाड या तरूणाने दारूच्या नशेत पिराचीकुरोली येथे थांबले. त्यावेळी गजेंद्रने दारूच्या नशेत बंधाऱ्यावरून भीमानदीच्या पात्रात उडी मारली. त्यानंतर गजेंद्र बेपत्ता झाला. घटनेची माहिती झाल्यानंतर स्थानिक नागरिक घटनास्थळी उपस्थित झाले. त्यानंतर स्थानिक नागरिकांनी त्याचा शोध घेतला असता, तो अद्याप सापडला नाही.

पंढरपुरात उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई

अवैध हात हातभट्टीची दारू वाहतूकी विरोधात पंढरपूर येथील उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई केली आहे. पंढरपूर जवळच्या भटुंबरे येथे एका कारमधून हातभट्टीची 400 लिटर दारूची अवैधरित्या वाहतूक केली जात असताना उत्पादन शुल्क विभागाने छापा टाकून कारवाई केली. कारवाईदरम्यान 400 लिटर दारू आणि 48 शिलबंद दारूच्या बाटल्या आढळून आल्या. या प्रकरणी तीन संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सोहळा संपन्न

Banana Cake: घरीच झटपट बनवा सॉफ्ट अन् टेस्टी बनाना केक, वाचा सोपी रेसिपी

Upvasachi Kachori: आषाढी एकादशी स्पेशल उपवासाची कचोरी, घरीच फक्त १० बनवा

Sushil Kedia : ठाकरेंची माफी मागितल्यावर केडियाची आणखी एक पोस्ट, थेट अमित शहा यांचेच नाव घेतलं

Varai Khichdi Upvas : उपवासाला साबुदाणे कशाला? झटपट करा वरईची खिचडी, नोट करा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT