Pandharpur Kartiki Mahapuja Saam tv
महाराष्ट्र

Kartiki Mahapuja : विठ्ठल मंदिरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त; सकाळी होणार महापूजा

Pandharpur News : मराठा आणि धनगर समाज आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षतेविषयी पोलिसांनी विशेष काळजी घेतली आहे

भारत नागणे

पंढरपूर : कार्तिकी यात्रेची विठ्ठल- रुक्मिणीची शासकीय महापूजा गुरुवारी पहाटे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. (Pandharpur) या पार्श्वभूमीवर विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये कडक (Police) पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. मंदिरातील सुरक्षेची पाहणी आज सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षक गिरीश देशपांडे यांनी केली. (Breaking Marathi News)

कार्तिकी एकादशी निमित्ताने पंढरपुरातील विठ्ठल रुख्मिणी मंदिरात शासकीय महापूजा होणार आहे. या पूजेला विरोध करण्यात आला होता. मात्र मंगळवारी झालेल्या बैठकीनंतर मराठा क्रांती मोर्चाने आपले आंदोलन मागे घेतले आहे. यामुळे (Kartiki Yatra) शासकीय महापूजेचा मार्ग मोकळा झाला आहे. परंतु धनगर व कोळी समाजाच्या आंदोलनाबाबत अद्याप काही अपडेट नाही. या पार्श्वभूमीवर पंढरपूरमध्ये पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. मराठा आणि धनगर समाज आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षतेविषयी पोलिसांनी विशेष काळजी घेतली आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

३ हजार पोलीस तैनात 

पंढरपूर शहरात सध्या सुमारे तीन हजाराहून अधिक पोलीस अधिकारी व कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात आहेत. विठ्ठल मंदिरामध्ये देखील पोलिसांची विशेष टीम सुरक्षेसाठी तैनात करण्यात आली आहे. विठ्ठल मंदिर व परिसरात आजपासूनच सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक शिरीष देशपांडे यांनी आज मंदिरातील विविध ठिकाणांची पाहणी करून मंदिरातील सुरक्षेचा आढावा घेतला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gastric cancer symptoms: पोटाचा कॅन्सर झाल्यानंतर सर्वप्रथम कोणतं लक्षण दिसतं? 99% लोकं या 6 लक्षणांकडे करतात दुर्लक्ष

Congress Protest Live Update : दिल्लीत भाजप महिला मोर्चाचं काँग्रेसविरोधात आंदोलन, पाहा व्हिडीओ

मोठी बातमी! दिल्लीतील जंतरमंतर आता आंदोलनासाठी बंद; ३ नवीन ठिकाणं जाहीर, भाजप सरकारचा निर्णय

Heart Attack : हार्ट अटॅक येण्यापूर्वी हातात दिसतात 'ही' लक्षणे, वेळीच ओळखलात तर वाचेल जीव

Maharashtra News Live Update: दिल्लीत भाजप आणि काँग्रेसचं आंदोलन

SCROLL FOR NEXT