Kartiki Ekadashi 2023 Saam tv
महाराष्ट्र

Kartiki Ekadashi 2023: पंढरपुरात भाविकांची मांदियाळी; १ लाख भाविकांनी घेतले विठुरायाचे मुख दर्शन

Pandharpur News : कार्तिकी सोहळ्यासाठी राज्यभरातून सुमारे पाच लाखांहून अधिक भाविक पंढरपुरात दाखल

भारत नागणे

पंढरपूर : कार्तिकी एकादशीनिमित्ताने पंढरपुरात भाविकांची मांदियाळी पाहण्यास मिळाली. पंढरपुरात (Pandharpur) दाखल भाविकांनी कार्तिकी एकादशी (Kartiki Ekadashi) आणि आजच्या द्वादशीला दुपारपर्यंत सुमारे एक लाख ७ हजार भाविकांनी विठुरायाचे मुख दर्शन घेतले. तर ५२ हजार भाविकांनी पदस्पर्श दर्शन घेतले. (Breaking Marathi News)

कार्तिकी एकादशीच्या दिवशी पंढरपुरात भक्तीचा महापूर आला होता. यंदाच्या कार्तिकी सोहळ्यासाठी (Kartiki Yatra) राज्यभरातून सुमारे पाच लाखांहून अधिक भाविक पंढरपुरात दाखल झाले होते. शासकीय महापूजे दरम्यान मुखदर्शन सुरू ठेवण्यात आले होते. सुमारे एक लाख सात हजार भाविकांनी मुख दर्शन घेतले. सरासरी एक मिनिटामध्ये ३५ भाविकांनी देवाचे पदस्पर्श दर्शन घेतले. वारी काळात भाविकांची संख्या मोजणीसाठी काऊंटींग सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

विना त्रास दर्शनाचा लाभ 

विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शनाची रांग गोपाळपूर रोडवरील पत्राशेडपर्यंत गेली होती. दर्शन रांगेचे दहा पत्रा शेड भाविकांनी भरले होते. दर्शन रांगेत गर्दी असतानाही यंदा भाविकांचे  सुलभ दर्शन झाले. दर्शन रांगेत यंदा मंदिर समितीने भाविकांसाठी विश्रांती कक्ष व बसण्यासाठी खुर्च्यांची व्यवस्था केली होती. त्यामुळे विना त्रास भाविकांना दर्शनाचा लाभ घेता आला. मंदिर समिती आणि प्रशासनाने उत्कृष्ट नियोजन केल्यामुळे एकादशीच्या दिवशी अधिकाधिक भाविकांना देवाच्या दर्शनाचा लाभ घेता आला; अशी माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी आज दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra CM : लोकसभेलाच डील, एकनाथ शिंदेच होणार मुख्यमंत्री; CM च्या जवळच्या नेत्याचा दावा

Maharashtra News Live Updates: एखनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्री होऊ नये - रामदास आठवले

Pune Crime: चितेजवळ सापडलेल्या लाकडावरील रक्तावरून हत्येचा छडा, वाईट नजरेने बघत असल्याने काढला काटा

Narsayya Adam : विधानसभेत चौथ्यांदा पराभव; माजी आमदार आडम यांची राजकारणातून निवृत्ती

Disha Patani: दिशाचा हॉटनेस पाहून म्हणाल, आला थंडीचा महिना, झटपट...

SCROLL FOR NEXT