Hotel gas leak leads to tragedy in Mangalwedha Saam TV News
महाराष्ट्र

Pandharpur: हॉटेलमध्ये गॅस लिकेज अन् भयानक स्फोट; २ चिमुकल्या मुलींचा होरपळून मृत्यू, आई- वडील गंभीर

Hotel gas leak leads to tragedy: पंढरपूरच्या नंदेश्वर येथे हॉटेलमधील गॅस स्फोटात दोन चिमुकल्या मुलींचा मृत्यू झाला. दोघे जण गंभीर जखमी. पोलिस तपास सुरू असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Bhagyashree Kamble

पंढरपुरातील हॉटेलमध्ये घरगुती गॅसचा स्फोट झाल्याकारणाने दोन चिमुकल्या मुलींचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. तर, दोन जण गंभीर असल्याची माहिती आहे. प्राथमिक माहितीनुसार, हॉटेलमध्ये खाद्य पदार्थ तयार करत असताना गॅस पाईपमधून लिकेज झाला. यामुळे स्फोट झाल्याची माहिती आहे. जखमींवर सध्या रूग्णालयात उपचार सुरू आहे. या घटनेची मंगळवेढा पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

मंगळवेढातील नंदेश्वर येथील एका हॉटेलमध्ये हा भयानक प्रकार घडला. खाद्य पदार्थ तयार करत असताना अचानक गॅस पाईप लिकेज झाली. लिकेज झाल्यामुळे भीषण स्फोट झाला. या स्फोटात ४ जण आगीच्या विळख्यात सापडल्याची माहिती आहे. आगीच्या कचाट्यात २ चिमुकल्या मुलींचा जागीच मृत्यू झाला. आगीत भाजल्यामुळे त्यांनी जागीच प्राण सोडले.

श्रेया दादासाहेब गंगथडे आणि स्वरा दादासाहेब गंगथडे असे मृत चिमुकल्या मुलींचे नाव आहे. तर, दादासाहेब आणि मोनाली गंगथडे हे गंभीर जखमी झाले आहेत. अपघात घडल्यानंतर त्यांना तातडीने सोलापुरातील रूग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे.=

या घटनेची माहिती मिळताच मंगळवेढा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तसेच मंगळवेढा पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. हा स्फोट नेमका कसा घडला? स्फोट घडण्यापूर्वी नेमकं काय घडलं? याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prajakta Mali: प्राजक्ता जणू सौंदर्याची खाण...

Parbhani : आदर्श शेतवाटणी! दोन प्राध्यापक भावांनी शेतकरी भावाला दिला अधिक हिस्सा; मुलांचे शिक्षण व लग्नाचीही घेतली जबाबदारी

Crime News: मुलीच्या छेडछाडीला विरोध केल्याने पित्याला अमानुष मारहाण; पाहा, VIDEO

Stress Relief: फक्त ५ मिनिटांत ताण कमी करण्यासाठी प्रभावी मानसिक उपाय

Maharashtra Live News Update: शिवसेना ठाकरे गटाच्या अखिल चित्रे यांनी मंत्री नितेश राणे यांना डिवचले

SCROLL FOR NEXT