Pandharpur News: Saam tv
महाराष्ट्र

Pandharpur News: पंढरपूरकरांचे आरोग्य धोक्यात; ड्रेनेजच्या पाण्यावर प्रक्रिया करून शहराला पाणीपुरवठा?

भारत नागणे

Pandharpur News:

पंढरपूर शहरात सध्या तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या पाणीटंचाईमुळे शहरात एक दिवस आड पाणीपुरवठा केला जात आहे. अशातच आता ड्रेनेजचे पाणी पात्रात सोडून त्यावर प्रक्रिया करण्यात येत आहे. त्यानंतर ते पिण्यासाठी वापरले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियामध्ये प्रचंड व्हायरल झाला आहे. (Latest Marathi News)

पंढरपुरात थेट ड्रेनेजचे पाणी नदी पात्रात सोडून ते पिण्यासाठी वापरले जात असल्याचे दिसून आले आहे. यामुळे पंढरपूर शहरातील नागरिकांकडून आता तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. याबाबतचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियामध्ये प्रचंड व्हायरल झाल्यानंतर ही बाब समोर आली आहे.

काय आहे प्रकरण?

पंढरपूर शहराच्या उपनगरातून ड्रेनेजचे पाणी चंद्रभागेच्या पात्रात सोडले जाते. पुढे याच पाण्याचा शहाराला पुरवठा होतो. तेच पाणी शहरातील नागरिकांना तसेच वारकरी भाविकांना शुद्धीकरण करून एक दिवसाआड दिले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

माजी नगरसेवक किरण घाडगे, नगरसेवक प्रशांत शिंदे, सामाजिक कार्यकर्ते सुरज पावले यांनी प्रत्यक्ष पाहणी करून व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.

नागरिकांना पुरवठा होणाऱ्या पाण्याचा वास येत असल्याने काही सामाजिक कार्यकर्त्यांनी पिण्याच्या पाण्याची चौकशी केली असता हा किळसवाणा प्रकार समोर आला आहे.

दरम्यान, या जीवघेण्या प्रकारामुळे अनेकांना साथीचे आजार, त्वचारोग होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ratnagiri Killing Case : स्वप्न पडलं, डेड बॉडीचं गूढ उलगडलं? रत्नागिरीतील हत्याकांडाचा सस्पेन्स उलगडणार? पाहा व्हिडिओ

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

Friday Horoscope: शुक्रवारी या 5 राशींचे नशीब फळफळणार, देवी लक्ष्मीची होणार कृपा; वाचा राशिभविष्य

SCROLL FOR NEXT