Crime News Saam tv
महाराष्ट्र

Crime News: निर्दयी बापाचे कृत्‍य; पाण्यात टाकून सात महिन्‍याच्‍या मुलाला बापानेच मारले

निर्दयी बापाचे कृत्‍य; पाण्यात टाकून सात महिन्‍याच्‍या मुलाला बापानेच मारले

भारत नागणे

पंढरपूर : वडील आणि मुलाच्या नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना पंढरपुरात समोर आली आहे. स्वतःच्या सात महिन्‍याच्‍या मुलाचा कॅनालच्या पाण्यात टाकून खून (Crime News) केल्या प्रकरणी सुभाष साहेबराव डुकरे या संशयित आरोपी बापास पोलिसांनी (Police) अटक केली आहे. (Tajya Batmya)

आरोपी आपल्या कुटुंबा समवेत ऊसतोडीच्या कामासाठी पंढरपूर तालुक्यातील सुपली गावात आले होते. 28 डिसेंबर रोजी पंढरपूरपासून जवळ असलेल्या सुपली हद्दीतील उजनी उजवा कालव्यामध्ये एक लहान मुलगा पडून मयत झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलीस निरीक्षक धनंजय व त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने सुपली येथील कॅनल जवळील घटनास्थळाकडे गेले. सात महिन्‍याचा विक्रांत नावाचा मुलगा कॅनॉलमधील साठलेल्या पाण्यामध्ये पडलेला दिसून आला.

मुकादमाकडे दाखविले होते बोट

संशयित आरोपी वडील सुभाष साहेबराव डुकरे (रा. ‌बाभूळगाल जि.नांदेड) यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी टोळी मुकादमावर संशय घेतला होता. पोलिसांनी संशयित मुकादमाची चौकशी केली असता त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही. दरम्यान पोलिसांनी आरोपी वडील सुभाष डुकरे यांची अधिक चौकशी केली असता सदरची धक्कादायक बाब समोर आली. प्रथम दर्शनी पोलिसांनी आरोपी बापाविरोधात खूनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. खूनाचे कारण मात्र अद्याप समोर आले नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Blouse Designs: जाड अन् बारीक अंगानुसार ब्लाऊज कसा निवडायचा?

Maharashtra Live News Update: अजित पवारांच्या राष्ट्रवादीची आज मुंबईत बैठक

High Blood Pressure: कोणतीही लक्षणं न दिसता होणारा आजार! हाय BPची कारणे वेळीच ओळखा, अन्यथा...

Road Robbery : सरकारी कर्मचारी अन् ग्रामपंचायत सदस्य मध्यरात्री सावज शोधायचे, हायवेवर सिनेस्टाईल दरोडा टाकायचे; १२ जण जाळ्यात अडकले

Rakesh Bedi: अभिनेत्याने ५१ वर्ष लहान धुरंधर एक्ट्रेस साराला केलं Kiss, नेटकऱ्यांना पटलं नाही, पाहा नेमकं झालं काय?

SCROLL FOR NEXT