Nandurbar ZP 
महाराष्ट्र

नंदुरबार जिल्‍हा परिषदेची विनंती पंचायत राज समितीने फेटाळली; आजपासून दौरा

नंदुरबार जिल्‍हा परिषदेची विनंती पंचायत राज समितीने फेटाळली; आजपासून दौरा

दिनू गावित

नंदुरबार : महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून जिल्हा परिषद, ग्रामपंचायत स्तरावरील गावपातळीवर होणाऱ्या विविध विकास कामांची व योजनांची पाहणी करण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यात सर्वपक्षीय ३२ आमदारांच्या पंचायत राज समिती आजपासून दौऱ्यावर आहे. 20 ते 22 ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये प्रत्यक्ष भेटी देऊन पाहणी केली जाणार आहे; तसेच नागरिकांकडून झालेल्या तक्रारींचे निराकरण देखील पंचायत राज समितीद्वारे करण्यात येणार आहे. (Panchayat-Raj-Samiti-rejects-Nandurbar-Zilla-Parishad's-request-Tour-from-today)

महाराष्ट्रातील सर्वात अतिदुर्गम भाग संबोधल्या जाणाऱ्या धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यात आजही अनेक गाव पाडे विकासापासून दूर आहे. जिल्हा दौऱ्यावर येणाऱ्या पंचायत समितीद्वारे दुर्गम भागातील गावांना प्रत्यक्ष भेटी देऊन विकास कामांची पाहणी होईल का? याबाबत या भागातील जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य व गावकरी यांच्यात उत्सुकता आहे. पंचायत राज समितीच्या दौऱ्यासाठी जिल्हा प्रशासन युद्धपातळीवर तयारी केली असली तरी प्रत्यक्ष गावांना भेटी देऊन विकास कामांची पाहणी केल्यावरच पंचायत राज समितीचा दौरा यशस्वी होईल. समितीसमोर लेखापरीक्षणाची माहिती देण्यासाठी यापूर्वी काम करून गेलेले मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी समितीच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी हजर राहणार आहे.

विनंती फेटाळली

जिल्हा परिषदेने पंचायत राज समितीला दौरा स्थगित करण्याबाबत विनंती केली होती. परंतु पंचायत राज समितीने ही विनंती फेटाळून २० ऑक्टोबरपासून जिल्ह्याचा दौरा करणार असल्याचे समितीने कळविले होते. जिल्हा परिषदेसह पंचायत समिती, जिल्हा परिषद शाळा, आरोग्य केंद्र व उपकेंद्र याठिकाणी भेटी देणार असल्याने तेथील स्वच्छता व सुशोभिकरणावर भर देण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chia Seeds: थंडीत सब्जा खा; त्वचा, वजन आणि तब्येतीसाठी उपयोगी

Maharashtra Live News Update: आष्टयात ईव्हीएम स्ट्रॉंग रूम समोर महाविकास आघाडी कार्यकर्त्यांच आंदोलन

Sanchar Saathi App: एका दिवसात ६ लाख लोकांनी डाउनलोड केला 'संचार सारथी'; अ‍ॅपची खासियत आहे तरी काय?

Kalyan : भाजपचा शिंदेसेनेला पुन्हा धक्का, कल्याणमधील शिलेदार फोडला

IND vs SA: आता तरी जिंकूदे! टॉस जिंकण्यासाठी केएल राहुलने वापरला खास टोटका, तरीही पदरी निराशाच; पाहा नाण्यासोबत कर्णधाराने काय केलं?

SCROLL FOR NEXT