Eknath Shinde
Eknath Shinde

नवस फेडण्यासाठी आले मंत्री एकनाथ शिंदे; नंतर झाली बंदद्वार चर्चा

नवस फेडण्यासाठी आले मंत्री एकनाथ शिंदे; नंतर झाली बंदद्वार चर्चा
Published on

जळगाव : राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी (ता. १९) पाचोरा येथे अचानक आले. हा त्‍यांचा खासगी दौरा असून एकनाथ शिंदे यांनी पाचोरा येथील मंदिरात नवस केला होता; त्यासाठी दर्शनासाठी म्हणून ते आल्याचे शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी दुजोरा दिला. मात्र यानंतर मंत्री शिंदे यांनी भेट देत मदार किशोर पाटील यांच्याशी बंद दरवाजाआड चर्चा केल्‍याचे देखील समजत आहे. (jalgaon-news-Minister-Eknath-Shinde-came-to-pay-his-vows-pachora-go;abrao-patil)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील काही तालुक्यांवर विशेष लक्ष केंद्रित करत तेथे करावयाच्या नियोजनाची जबाबदारी मंत्री शिंदे यांच्याकडे दिली आहे. अशा गुप्त दौऱ्यांना पाचोरा येथून सुरवात केल्याचे समजते. मात्र शिंदे यांचा हा खासगी दौरा असल्‍याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले. तसेच एकनाथ शिंदे यांच्या समवेत नगरपालिका व महानगरपालिका संदर्भात चर्चा झाल्याचेही गुलाबराव पाटील यांनी माहिती दिली.

विकासकामांचाही आढावा

अत्यंत गुप्तपणे झालेल्या या दौऱ्यात मंत्री श्री. शिंदे यांनी पाचोरा व भडगाव नगरपरिषद अंतर्गत सुरू असलेल्या विकासकामांचा आढावा घेतानाच आमदार पाटील यांच्याकडून पालिकेच्या आगामी राजकारणाची माहिती जाणून घेतली. पाचोरा नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी करावयाच्या रणनीतीबाबत त्यांनी गुप्तगू केली.

Eknath Shinde
दिवाळीत सांभाळा..अन्‍यथा डिसेंबरअखेर कोरोनाची तिसरी लाट

तिघांची बंदद्वार चर्चा

या भेटीवेळी राममंदिर परिसरात मंत्री एकनाथ शिंदे, आमदार किशोर पाटील व मुकुंद बिल्दीकर या तिघांमध्ये बंदद्वार चर्चा झाली; मात्र कोणत्‍या विषयांवर चर्चा झाली हे समजू शकले नाही.

महाजनांना पुन्हा धक्का द्यावा लागेल : गुलाबराव पाटील

जळगाव महापालिकेत सत्‍तांतरासाठी फोडाफोडीचे राजकारण झाले. भाजपच्‍या नगरसेवकांना फोडून शिवसेनेने महापालिकेवर सत्‍ता काबिज केली. मात्र फुटलेल्‍या त्‍या नगरसेवकांनी पुन्‍हा भाजपत घरवापसी केली आहे. परंतु, भाजपमध्‍ये परतलेले ते नगरसेवक पुन्हा शिवसेनेत परतणार असल्‍याचा दावा शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी केला. असे करून गिरीश महाजन यांना पुन्हा धक्का द्यावा लागेल असा निशाणा देखील पाटील यांनी साधला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com