sangli, Court saam tv
महाराष्ट्र

Sangli : अपघाताचा बनाव करत वृद्धाचा खून; पलुस न्यायालयाने पाच जणांना सुनावली पाेलिस काेठडी

पाेलिसांनी घटनेचा कसून तपास केल्याने खरा प्रकार उघडकीस आला.

विजय पाटील

Sangli Crime News : सांगली (sangli) जिल्ह्यातील पलुस तहसिल कार्यालय ते कराड-तासगाव रोडकडे जाणाऱ्या पलुस पोलीस ठाण्यासमोर २० जानेवारी रोजी वृद्ध विजय नाना कांबळे (वय ६५) यांना पाठीमागून कारची जोराची धडक देऊन अपघात (accident) झाल्याचा बनाव करत खून केल्याचे पाेलिस तपासात स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी पाच संशयितांना अटक (arrest) केली आहे. पलूस न्यायालयाने (court) सर्वांना १४ फेब्रुवारी पर्यंत पोलीस काेठडी सुनावली आहे.

मयत कांबळे हे २० जानेवारी रोजी दुपारी तहसिल कार्यालय ते कराड-तासगाव रोडकडे निघाले होते. यावेळी पाठीमागून वेगाने आलेल्या अज्ञात कारने जोराची धडक देत गंभीर जखमी (injured) केले होते. जखमी अवस्थेत पलुस पोलिसांनी विजय कांबळे यांना उपचाराकरीता मिरज सिव्हील हॉस्पीटल येथे दाखल केले होते. (Maharashtra News)

हा अपघात प्रत्यक्ष पाहणारे जितेश सुरेश बनसोडे यांनी अपघाताची तक्रार पाेलिसांत दाखल केली होती. मिरज सिव्हील हॉस्पीटलमध्ये उपचारदरम्यान कांबळे यांचा २१ जानेवारी रोजी मृत्यू झाला होता. त्यावेळी पोलीस ठाण्यात अज्ञाता विरोधात अपघाताचा गुन्हा दाखल केला होता. अपघात की खून हे स्पष्ट करण्यासाठी पोलिसांनी गुन्हा घडल्यापासून पोलीस ठाण्याचा कुंडलकडे जाणाऱ्या प्रत्येक ठिकाणाचा सिसिटीव्ही चेक केला.

यामध्ये एक गाडी बिगर नंबर प्लेटची गेल्याचे आढळून आले. वाहनाचा शोध घेण्यासाठी सांगली ,कोल्हापूर येथे पथके पाठवली. तपासात गाडी ही कोल्हापूर जिल्ह्यातील असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. शोध घेवून संबंधित वाहनाचा मालकाकडे तपास केला असता त्यांनी वाहन सन २०२१ मध्ये इस्लामपूर हद्दीतील भवानीनगर येथील संग्राम राजेंद्र पाटील यास २ लाख रुपयास गहाण दिले होते असे निष्पन्न झाले.

त्यानंतर संग्राम पाटील यास पोलिसांनी ताब्यात घेऊन तपास केला. त्यानंतर पलुस येथील सुनिल घोरपडे, अभयसिंह पाटील यांचेशी संपर्क असलेचे तांत्रिक पुराव्यावरुन स्पष्ट झाले. पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार मयत कांबळे तसेच अभयसिंह पाटील व सुनिल घोरपडे यांचेत बांबवडे येथील १२ एकर जमिनीचा वाद होता. कांबळे यांच्याकडे कुळाची जमीन होती.

जमीनीच्या वादातुन व मयत कांबळे हे खोटे गुन्हे दाखल करतो म्हणुन त्यांनी संग्राम पाटील याला मयत कांबळेला उचलून नेणे किंवा वाहनाची धडक देणे यासाठी पाच लाख रुपयाची सुपारी दिली होती. संग्राम पाटील व त्याचे मित्र रुतीक पाटील, रोहन पाटील यांनी २० जानेवारी रोजी मयत कांबळे हे कोर्टात कामाकरीता आलेवर त्यांचेवर पाळत ठेवुन होते. कोर्टातुन काम आटोपून पायी चालत जात असताना त्यांना कारने पाठीमागुन धडक दिली. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

वांगणीत रेल्वे प्रशासनाची 'अशी ही बनवाबनवी'; वनविभागाची परवानगी न घेता भूयारी मार्गाचं काम, चूक लक्षात येताच जागा बदलली

Maharashtra Politics: पिंपरी चिंचवडमध्ये अजितदादांनी खेळला डाव, भाजपसह ठाकरे गटाला 'दे धक्का, ८ जणांनी हाती बांधलं घड्याळ

Co-ord Sets: ऑफिस आणि कॉलेज वेअरसाठी ट्राय करा कम्फर्टेबल आणि ट्रेंडी को-ऑर्ड सेट्स, तिन्ही सिझनसाठी परफेक्ट चॉईस

Maharashtra Live News Update: मंत्री माणिकराव कोकाटे यांना उच्च रक्तदाबाचा त्रास?

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय, मंत्रिमंडळ बैठकीत काय ठरलं?

SCROLL FOR NEXT