यंदा पालखी सोहळा एसटीने की हेलिकॉप्टरने? गोपाल मोटघरे
महाराष्ट्र

यंदा पालखी सोहळा एसटीने की हेलिकॉप्टरने?

तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचा पंढरपूरच्या दिशेने होणारा प्रवास आता एसटी बस ने नाही तर थेट हेलिकॉप्टर द्वारा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

गोपाल मोटघरे

पुणे : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर ज्ञानोबा-तुकोबांच्या पालखीचा पायी होणार सोहळा गेल्या वर्षी एसटी बसच्या माध्यमातून करण्यात आला. मात्र, यावर्षी आषाढीवारी निमित्त तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचा पंढरपूरच्या दिशेने होणारा प्रवास आता एसटी बस ने नाही तर थेट हेलिकॉप्टर द्वारा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. Palkhi ceremony By Helicopter

हे देखील पहा -

या सोहळ्यासाठी पुण्यातील महालक्ष्मी एव्हिएशनचे मालक दत्तात्रय गोते यांनी आपले तीन हेलिकॉप्टर देखील सज्ज केले आहेत. अत्यंत प्रशस्त, अत्याधुनिक आणि सुरक्षित असलेल्या या हेलिकॉप्टर मधून आषाढी वारी निमित्त तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुका या वर्षी पंढरपूरला नेण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

प्रशासकीय यंत्रणा आणि देहू-आळंदी संस्थांनाशी देखील या बाबत पत्रव्यहर केला असून संस्थानातील अनेक जण यासाठी सकारत्मक असल्याची माहिती गोते यांनी दिली आहे. एकूणच दोन्ही संतांच्या पादुकांचा हवाई प्रस्थान सोहळा झाल्यास हा सोहळा ऐतिहासिक ठरण्याची शक्यता आहे. दरम्यान, कोरोनाची परिस्थिती बघता जास्त लोकांच्या गर्दीत प्रस्थान सोहळा करण्याऐवजी थेट हेलिकॉप्टर द्वारा पादुका नेल्या जात असतील तर ही बाब अधिक स्वागतार्ह आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'Bigg Boss 19'च्या स्पर्धकावर हिना खान भडकली, फरहाना भट्ट नेमकं काय म्हणाली?

Sangli Accident : कारने बाईकला चिरडलं, आजी-आजोबा अन् नातवाचा जागीच मृत्यू, सांगलीत भयानक अपघात

Pollution Free Pune : पुणेकरांनो मोकळा श्वास घ्या, शहरातील हवेची गुणवत्ता सुधारली, देशात दहावा क्रमांक

Mahayuti Government: दररोज ५३ शासन निर्णय; पण अंबलबजावणीसाठी आमदारांना निधीच मिळेना, महायुती सरकारने ९ महिन्यात किती GR काढले?

Viral News: 500 रुपयांची नोट बंद होणार? ATMमध्ये 100-200 च्याच नोटा मिळणार? काय आहे सत्य, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT