Palghar News Saam tv
महाराष्ट्र

Palghar Crime : पैशांसाठी भाडेकरूचे भयानक कृत्य; वाडा तालुक्यातील तिहेरी हत्याकांडाबाबत धक्कादायक माहिती आली समोर

Palghar News : मागील आठवड्यात मुकुंद राठोड त्यांची पत्नी कांचन राठोड आणि मुलगी संगीता राठोड या तिघांचा मृतदेह बंद घरात आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती

रुपेश पाटील

पालघर : पालघरच्या वाडा तालुक्यातील नेहरोली येथे मागील आठवड्यात बंद घरात तिघांचा मृतदेह आढळून आल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. दरम्यान या तिहेरी हत्याकांडाचा उलगडा करण्यात पालघर पोलिसांना यश आले असून भाडेकरू असलेल्या व्यक्तीनेच पैशांसाठी घर मालकाचा खून केल्याची माहिती समोर आली आहे. 

पालघरच्या (Palghar) वाडा तालुक्यातील नेहरोली येथे मागील आठवड्यात मुकुंद राठोड त्यांची पत्नी कांचन राठोड आणि मुलगी संगीता राठोड या तिघांचा मृतदेह बंद घरात आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. सदर प्रकरणाचा पोलिसांकडून (Police) तपास सुरु असताना या प्रकरणात याच राठोड कुटुंबीयांकडे भाडेकरू म्हणून राहणाऱ्या उत्तर प्रदेशातील आरिफ अन्वर अली यानेच सदर कृत्य केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या संशयित आरोपीला पालघर पोलिसांनी उत्तर प्रदेशातून अटक केली आहे. 

पैशांसाठी तिघांना संपविले 

घर मालकांकडे पैसे असतील, त्यातून त्याने चोरी करण्याचा प्लॅन आखला. चोरीच्या उद्देशाने अन्वर याने तिघांचीही (Crime News) डोक्यात हातोडा घालून निघृण हत्या केल्याचं उघड झाले आहे. तसेच हत्येनंतर तो उत्तर प्रदेशात पसार झाला होता. मात्र या सगळ्या तपासात पालघर पोलिसांना ठाणे येथील श्वानपथकाने विशेष मदत केली असून सध्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. तसेच ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांसोबत आणखीन कोणी या हतेच्या कटात सामील होतं का? याचा तपास सध्या पालघर पोलिसांकडून केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Relationship Tips: तुमच्या जोडीदाराला द्या 'या' रंगाचा रत्न, प्रेमात गोडवा वाढेल

Maharashtra Exit Polls: राजुरामध्ये अपक्ष उमेदवार वामनराव चटप होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Exit Polls of Maharashtra : शेकापच्या बालेकिल्ल्यात धनुष्यबाण चालणार? पाहा एक्झिट पोल

पायात काळा धागा का बांधला जातो? जाणून घ्या

Baramati News : अजित पवारांचे भावी मुख्यमंत्री म्हणून झळकले फलक; बारामतीत कार्यकर्त्यांनी लावले फ्लेक्स

SCROLL FOR NEXT