Wada Crime Saam tv
महाराष्ट्र

Wada Crime : सहा महिन्यांपूर्वी घरातून दागिने चोरीचा उलगडा; चोरी करणारी महिला गजाआड

Palghar News : वाडा तालुक्यातील सापरोंडे गावातील जयेश जाधव यांच्या घरात ऑगस्ट महिन्यात चोरी झाली. मात्र घरातील व्यक्तीने दागिने कुठे ठेवले असतील असा भ्रम झाल्याने पोलिस ठाण्यात फिर्याद दिली नव्हती

Rajesh Sonwane

फैय्याज शेख

वाडा (पालघर) : घरातून दागिने चोरी झाले. मात्र घरातील सर्व मंडळी याबाबत अनभिन्न होती. दरम्यान जाधव परिवारातील सून घरी आल्यानंतर दागिने चोरी झाल्याचे लक्षात आले. यानंतर घरातून दागिने चोरी करून ते दागिने परस्पर विक्री करणाऱ्या महिलेला दागिन्यासह महीला वाडा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील सापरोंडे गावातील जयेश रवींद्र जाधव यांच्या घरात ऑगस्ट महिन्यात चोरी झाली होती. मात्र घरातील कोणीतरी व्यक्तीने दागिने कुठे ठेवले असतीला असा भ्रम झाल्याने याबाबत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली नव्हती. मागच्या महिन्यात जाधव यांची सून घरी आली असता घरातील दागिने गायब झाल्याचे लक्षात आले. या नंतर घरातील लोकांनी वाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. 

महिलेने चोरी केल्याचे उघड 

सदर तक्रारीच्या अनुषंगाने वाडा पोलिसांनी जलद गतीने तपास सुरू केला. तेव्हा एक महिला घराजवळ वावरत असल्याचे सीसीटीव्ही कॅमेरात दिसून आले. या महिलेची अधिक माहिती घेतली असता सदर महिलेने वज्रेश्वरी येथे एका व्यक्तीला सोने विक्री केली असल्याची माहिती मिळाली. सदर तपासकामी वज्रेश्वरी येथील व्यक्तीला बोलावून चौकशी केली असता महिलेने दागिने विक्री केल्याचे तपासात समोर आले. 

चोरी करणारी महिला ताब्यात 

सहा महिन्यांपूर्वी घरात झालेल्या चोरीचा उलगडा झाला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरु करण्यात आला असता यानंतर दागिने चोरी करणाऱ्या महिलेच्या विरोधात वाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून तीला अटक केली आहे. महिलेने चोरी केलेले दागिने हस्तगत करण्यात आले असून या प्रकरणी महिलेची अधिक चौकशी करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नाशिकमध्ये खरात पार्ट २; NGO संस्था चालकाकडून १२१ महिलांचं लैंगिक शोषण

Cheesy White Sauce Maggi: चमचमीत नाश्ता हवाय? बनवा चीज व्हाईट सॉस मॅगी, सोपी आहे रेसिपी

इराणमध्ये अमिरेकन लढाऊ विमान कोसळलं, पायलटला पकडण्यासाठी बक्षीस केलं जाहीर, VIDEO

Fact Check: केंद्र सरकारची वर्क फ्रॉम होम योजना? महिलांना 25 हजार मानधन मिळणार?

Ashok Kharat: मुलानेच उघड केलं खरातचं हवाला कांड? चौकशीदरम्यान SIT ला सांगितली धक्कादायक माहिती

SCROLL FOR NEXT