Palghar News Saam tv
महाराष्ट्र

Palghar News : उंबरगाव मराठी शाळेतील पटसंख्या घटली; केवळ ५५ विद्यार्थी गिरवताय शिक्षणाचे धडे

Palghar : १९६० साली स्थापन झालेल्या या शाळेत काही वर्षांपूर्वी १५० ते २०० विद्यार्थ्यांची पटसंख्या असायची. मात्र ती सध्या कमी झाली असून या शाळेत ५५ विद्यार्थी मराठी शिक्षण घेत आहेत

रुपेश पाटील

पालघर : राज्यभरात मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जात आहे. मात्र गुजरातमधील उंबरगाव येथील मराठी शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. विशेष म्हणजे या शाळेत सध्या नेपाळी विद्यार्थ्यांची संख्या वाढताना दिसून येत आहे. १९६० साली सुरू करण्यात आलेल्या या उंबरगाव येथील मराठी शाळेत सध्या १५ पेक्षा अधिक नेपाळी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

महाराष्ट्राच्या सीमेलगत गुजरातच्या वलसाड जिल्ह्यातील सध्याचे उंबरगाव हे शहर पूर्वीच्या ठाणे जिल्ह्यात होतं. मात्र १९६० नंतरच्या चळवळीनंतर उंबरगाव तालुका गुजरातमध्ये समाविष्ट करण्यात आला. यानंतर या भागातील मराठी शाळा काही बंद झाल्या असून उंबरगाव येथील ही मराठी मिश्र शाळा आजही सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र या शाळांमधील पटसंख्या घातल्याचे पाहण्यास मिळत आहे. 

शाळेत केवळ आता ५५ विद्यार्थी 

उंबरगाव हा पूर्वीचा महाराष्ट्रातील भाग होता. मात्र चळवळीनंतर तो गुजरातमध्ये समाविष्ट झाला. या भागात आजही पालघर, ठाणे या परिसरातील मराठी बांधव राहत असून त्यांनी देखील आपल्या पाल्यांना या मराठी शाळांमध्ये पाठवण्याकडे पाठ फिरवल्याचं चित्र आहे.  १९६० साली स्थापन झालेल्या या शाळेत काही वर्षांपूर्वी १५० ते २०० विद्यार्थ्यांची पटसंख्या असायची. मात्र ती सध्या कमी झाली असून या शाळेत ५५ विद्यार्थी मराठी शिक्षण घेत आहेत. 

१५ नेपाळी विद्यार्थी घेताय शिक्षण 

असं असलं तरी या ५५ पैकी तब्बल १५ पेक्षा अधिक विद्यार्थी हे नेपाळी असून ते मराठीचे धडे गिरवताना पाहायला मिळतात. उंबरगाव येथील या मराठी मिश्र शाळेत विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस घटताना दिसून येते. या भागात असलेल्या अनेक मराठी मिश्र शाळा मराठी विद्यार्थ्यांच्या पटसंख्या अभावी बंद पडल्या आहेत. त्यातच आता एकमेव सुरू असलेल्या या मराठी शाळेत देखील विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस घटत असल्याने शिक्षकांकडून देखील चिंता व्यक्त करण्यात येत आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT