पालघर : रक्षाबंधनाचा सण सर्वत्र साजरा केला जात आहे. याच दरम्यान पालघर पोलीस प्रशासना मार्फत आजचा रक्षाबंधनाचा सण अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. रस्त्यावरून विना हेल्मेट दुचाकी चालविणाऱ्यांना थांबवून महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी ओवाळीनि करत राखी बांधली.
दिवसेंदिवस वाढणारे अपघात यामुळे बाईक चालवताना हेल्मेटची आवश्यकता आहे. मात्र अनेकजण विना हेल्मेट दुचाकी चालवत असतात. याची जनजागृती करण्यासाठी (Palghar) पालघर पोलीस प्रशासनाकडून ही अनोखी मोहीम राबवण्यात आली. पालघर पोलीस प्रशासनाकडून रक्षाबंधनानिमित्ताने (Raksha Bandhan) हा उपक्रम राबविण्यात आला. पालघरमधील शहरी भागांसह ग्रामीण भागात विना हेल्मेट फिरणाऱ्या दुचाकीस्वारांना महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी ओवाळणी करत राखी बांधून हेल्मेट दिलं.
६०० जणांना दिले हेल्मेट
महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी ओवाळणी करताना महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी बाईकस्वारांना हेल्मेटचे महत्त्व पटवून दिले. पहाटेपासून साधारणतः सकाळी अकरा वाजेपर्यंत पालघरच्या ग्रामीण भागात जवळपास ६०० पेक्षा अधिक बाईकस्वारांना हेल्मेट वाटप करण्यात आलं असून आज दिवसभर पालघर पोलीस प्रशासनामार्फत ही जनजागृती केली जाणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.