Palghar Accident News / file Saam tv
महाराष्ट्र

Mumbai-ahmedabad Highway Accident: मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात; दुचाकीवरील ३ कामगारांचा मृत्यू

Palghar Accident News : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पालघरमधील मनोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सातिवली येथे भीषण अपघात झाला.

Nandkumar Joshi

रुपेश पाटील, पालघर

Palghar Accident News : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पालघरमधील मनोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सातिवली येथे भीषण अपघात झाला. महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकला भरधाव दुचाकीने मागून धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील तिघांचा जागीच मृत्यू झाला. (Latest Marathi News)

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पालघर जिल्ह्यातील मनोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात झाला. सातिवलीजवळ काल रात्रीच्या सुमारास उभ्या असलेल्या ट्रकला भरधाव दुचाकीने जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, दुचाकीवरील तिघेही जागीच ठार झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, दुचाकीवरून तिघे जण घरी परतत होते. नरेश लाडक्या भोईर (वय २२, रा. करसोड), सूरज राघ्या ठाकरे ( वय १८, रा. डोल्हारी बुद्रुक), मयूर विनोद ठाकरे ( वय 17, डोल्हारी बुद्रुक) अशी तिघांची नावे आहेत.

या अपघातात तिघांचाही मृत्यू झाला. तिघेही विक्रमगड तालुक्यातील रहिवासी होते. वसईच्या एका कारखान्यात ते काम करत होते. वसईतील कारखान्यातून सुट्टी झाल्यावर तिघेही घरी जात होते. त्याचवेळी हा भीषण अपघात झाला.

तुमसर-भंडारा राज्यमार्गावरही कार-ट्रक अपघात, ४ जखमी

तुमसर- भंडारा राज्यमार्गावरील खरबी शेत शिवारात एका कारला कोळशाची वाहतूक करणाऱ्या ट्रकने समोरून जोरदार धडक दिली. या अपघातात चार जण जखमी झाले असून, कारमधील दहा जण थोडक्यात बचावले.

ही घटना रविवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडली. अपघातानंतर चालक ट्रकसह पसार झाल्याची माहिती आहे. कारच्या समोरच्या भागाचा चेंदामेंदा झाला. मोहाडी पोलिसांनी या घटनेची नोंद केली आहे. तसेच संबंधितावर गुन्हा दाखल केला असून ट्रकचालकाचा शोध घेण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिवरायांच्या 12 किल्ल्यांना जागतिक वारशाचा दर्जा, युनेस्काच्या यादीत समावेश, जाणून घ्या नावे | VIDEO

Jai Shivaji : जय शिवाजी! छत्रपती शिवरायांचे १२ किल्ले युनेस्कोच्या यादीत, वाचा इतिहास| PHOTO

सावधान! दूधात तेल आणि चुना? तुम्ही पिताय भेसळयुक्त दूध ? आमदारांनी डेमो दाखवला...कारवाई कधी?

Aeroplane Etiquette: टूथपेस्ट ते परफ्यूम... विमानात पायलटला कोणत्या गोष्टी नेण्यास बंदी असते?

Chhatrapati Shivaji Maharaj : शिवरायांचा आठवावा प्रताप! छत्रपतींच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या १२ किल्ल्यांना UNESCO World Heritage दर्जा

SCROLL FOR NEXT