Palghar Rural Hospital Saam tv
महाराष्ट्र

Palghar Rural Hospital : नवजात बाळाच्या उपचारासाठी प्रसूत महिलेचा ८० किमीचा प्रवास; पालघर आरोग्य विभागाचा ढिसाळ कारभार

Palghar news : ग्रामीण भागातील नागरिकांची आरोग्यासाठी होणारी हेळसांड लक्षात घेऊन दहा वर्षांपूर्वी ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून पालघर जिल्ह्याची निर्मिती मात्र आजही जिल्ह्यातील आरोग्यवस्था सक्षम नाही

रुपेश पाटील

पालघर : पालघर जिल्ह्यातील आरोग्यवस्थेचा ढिसाळ कारभार दिवसेंदिवस समोर येऊ लागला आहे. आता प्रसूती झालेल्या एका महिलेला आपल्या बाळांवर उपचार करण्यासाठी पालघर मधून थेट जव्हार असा ८० किलोमीटरचा प्रवास करावा लागला असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या सगळ्या प्रकारानंतर जिल्हा निर्मितीच्या दहा वर्षानंतरही पालघर मधील आरोग्यव्यवस्था आजही खिळखिळी असल्याचे समोर आले असून आरोग्य व्यवस्था सुधारण्यात राज्यकर्त्यांना अपयश येत असल्याचा आरोप केला जाऊ लागला आहे.

ग्रामीण भागातील नागरिकांची आरोग्यासाठी होणारी हेळसांड लक्षात घेऊन दहा वर्षांपूर्वी ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून पालघर जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. मात्र दहा वर्षे उलटल्यानंतर आजही पालघर जिल्ह्यातील आरोग्यवस्था सक्षम झाली नसून आजही जिल्ह्यासाठी स्वतंत्र जिल्हा रुग्णालय नाही. त्यातच मनोर येथे सुरू असलेल्या ट्रॉमा केअर सेंटरच देखील काम मागील अनेक महिन्यांपासून रखडल असून अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये देखील वैद्यकीय अधिकाऱ्यांचा अभाव पाहायला मिळत आहे. या सगळ्यामुळे मुंबई, ठाणे या महानगरालगत असलेल्या पालघर जिल्ह्यात आरोग्य विभागाचा उडालेला बोजवारा हा अनेकांच्या जीवावर बेतला आहे.

नवजात बालकांना घेऊन गाठले जव्हार 

पालघर तालुक्यातील सफाळे जवळील नगावे येथील निकिता निलेश डगला या महिलेला दोन दिवसांपूर्वी प्रसुतीसाठी कुटुंबीयांनी आधी मासवण येथील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि त्यानंतर पालघर ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली. प्रसूतीनंतर निकिता यांना दोन जुळी मुलं झाली. मात्र या दोन्ही मुलांचे वजन कमी असल्यान त्यांना जव्हार येथील विशेष नवजात शिशु देखभाल कक्षात रेफर करण्यात आले. पालघर जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या रुग्णालयात हा शिशु देखभाल कक्ष नसल्याने डगला कुटुंबीयांनी थेट ८० किलोमीटरचा प्रवास करत जव्हार रुग्णालय गाठलं. सध्या या दोन्ही शिशूंची प्रकृती स्थिर असली तरी पालघरमध्ये आरोग्य व्यवस्था ढिसाळ असल्याचं या प्रकारानंतर पुन्हा एकदा समोर आला आहे.

आरोग्याच्या अपूर्ण सुविधा 
पालघर जिल्ह्यात आजही बालमृत्यू आणि माता मृत्यूचा आकडा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. मात्र प्रशासन आणि येथील राजकीय नेते हे या सगळ्यापासून अनभिज्ञ असल्याच अनेक वेळा उघड झाले आहे. पालघर जिल्ह्यात आरोग्य व्यवस्थेची सध्याची परिस्थिती ही गंभीर असल्याची कबुली देत खुद्द पालघरचे आमदार राजेंद्र गावित यांनी सत्ताधाऱ्यांना घरचा आहेर दिला आहे. तर पालघर जिल्ह्यात आजही आरोग्यवस्थेच्या अपुऱ्या सोयी सुविधा असल्याची कबुली खुद्द पालघर आरोग्य विभागाचे जिल्हा शल्य चिकित्सक रामदास मराड यांनी दिली आहे.

गुजरातमध्येही जातात रुग्ण 
रुग्णालयांमध्ये सोयी सुविधांचा अभाव, अपुऱ्या रुग्णवाहिका, जिल्ह्यात ५० टक्क्यांहून अधिक रिक्त असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या जागा या सगळ्यामुळे पालघर जिल्ह्यातील आरोग्य विभाग नेहमीच चर्चेत असते. त्यामुळे उपचार मिळत नसल्याने पालघर जिल्ह्यातील अनेक रुग्णांना थेट गुजरात आणि दादरा नगर हवेली सारख्या राज्यांचा आसरा घ्यावा लागतोय. मात्र यासाठी पालघरमधील रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांना मोठी पायपीट करावी लागत असल्यान येथील आरोग्यवस्था सक्षम करण्यात सरकारनेच पुढाकार घ्यावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kharadi Rave Party: पार्टीत ड्रग्ज सापडलं..;पुण्यातील रेव्ह पार्टीवर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया

गाणं लावण्यावरून वाद; शिंदेंच्या नेत्याकडून तरूणावर प्राणघातक हल्ला, काळंनिळं होईपर्यंत मारलं

Maharashtra Live News Update: पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरण; सर्व आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी

5G Phones India : कोणत्या स्वस्तात कमी बजेट मध्ये 5G फोन कॅमेरा आणि बॅटरी लाईफ चांगली आहे?

Ambarnath Crime : अंबरनाथमधील हल्ला प्रकरणात धक्कादायक खुलासा; सहा तरुणांविरोधात गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT