Palghar Mokhada Farmer Sucide Attempts Saam Tv
महाराष्ट्र

Palghar Farmer : जमिनीच्या ७/१२ उताऱ्यावर खोटी नावं बघून शेतकरी संतापला, अंगावर रॉकेल ओतलं अन्...

Palghar Mokhada Farmer Sucide Attempts : मोखाडा तालुक्यात ७/१२ उताऱ्यावर खोटी नावे नोंदविल्याचा आरोप करत २६ वर्षीय शेतकऱ्याने नायब तहसीलदार दालनात अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला.

Alisha Khedekar

  • 26 वर्षीय शेतकऱ्याचा ७/१२ नोंदीवरून आत्मदहनाचा प्रयत्न

  • खोटे न्यायालयीन दस्तावेज सादर केल्याचा आरोप

  • महसूल अधिकारी व तलाठ्यांनी चौकशी न केल्याचा दावा

  • कडक कारवाई व सखोल चौकशीची मागणी

फैय्याज शेख , शहापूर

मुखाडा मधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. शिरसोनपाडा येथील जमिनीच्या ७/१२ उताऱ्यावर खोटी नावे नोंदविण्यात आल्याचा आरोप केला. अर्जदार राजु भाऊ मालक यांनी रात्री नायब तहसीलदारांच्या दालनात अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. वेळेवर हस्तक्षेप झाल्याने मोठा अनर्थ टळला.

अर्जदार शेतकरी याच्या म्हणण्यानुसार त्यांच्या वडिलोपार्जित जमिनीत मयत कै.सोमी जेठू मालक यांचे नाव होते.त्यांचा दि. २१ फेब्रुवारी २०२३ रोजी मृत्यू झाला असून त्यांना कोणताही कायदेशीर वारस नसताना जव्हार दिवाणी न्यायालयात तुकाराम चेतु मालक यांनी खोटे दस्तावेज सादर करून न्यायालयाची दिशाभूल केल्याचा आरोप आहे.

त्याच दस्तावेजांच्या आधारे मंडळ अधिकारी व तलाठी यांनी कोणतीही स्थानिक चौकशी न करता आणि कथित राजकीय दबावाखाली जमिनीच्या ७/१२ उताऱ्यावर नावे नोंदविल्याचे अर्जदाराने नमूद केले आहे. या प्रकरणी संबंधितांवर कायदेशीर कारवाई करून कै.सोमी जेठू मालक यांना कथितपणे वारस म्हणून लावलेली नावे तातडीने कमी करावीत, अशी मागणी करत अर्जदाराने यापूर्वी मोखाडा पोलीस ठाणे, तहसील कार्यालय मोखाडा तसेच उपविभागीय अधिकारी कार्यालय, जव्हार येथे निवेदने दिली होती. मात्र प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नसल्याचा आरोप करत, दहा दिवसांत कारवाई न झाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा अर्जदाराने दिला होता.

काल प्रत्यक्षात नायब तहसीलदारांच्या दालनात आत्मदहनाचा प्रयत्न झाल्यानंतर महसूल यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर तीव्र प्रश्न उपस्थित झाले आहेत. विशेषतः संबंधित तलाठी शरद बिन्नर यांच्या चुकीच्या नोंदी मुळेच ही वेळ आल्याचा आरोप अर्जदाराच्या कुटुंबीयांनी केला आहे.या गंभीर घटनेला जबाबदार कोण, खोट्या दस्तावेजांवर नोंदी कशा झाल्या आणि चौकशी अभावी सामान्य शेतकऱ्याला टोकाचे पाऊल उचलण्याची वेळ का आली, याची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात टोळक्याकडून कोयत्याने वाहनांची तोडफोड

BMC Election: BMC साठी भाजपकडून १३७ उमेदवारांची फायनल यादी जाहीर, वाचा कुणाला कुठून मिळाले तिकीट?

Shocking : कोट्यवधींच्या संपत्तीचा मोह, जमीन-जुमल्याच्या लालसेपोटी रिटायर हवाई दल ऑफिसरची सूनेने केली हत्या

New Year 2026: भारताच्या ८ तास आधीच 'या' देशात नवीन वर्ष सुरू; जगभरात जल्लोषाला सुरुवात!

Happy New Year! ऐन वेळी स्टेटस शोधू नका; 'इथे' वाचा WhatsApp-Facebook साठी मराठी, हिंदी आणि English शुभेच्छा मेसेज

SCROLL FOR NEXT