Palghar Viral Video :  Saam tv
महाराष्ट्र

Palghar Viral Video : पालघरमध्ये भाजपने पैसे वाटल्याचा आरोप; व्हिडिओ सोशल मीडिया व्हायरल

रुपेश पाटील. साम टीव्ही, पालघर

पालघर : राज्यातील सर्व जागांवरील लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या आहेत. राज्यातील पालघर लोकसभा मतदारसंघातील मतदान प्रक्रिया पार पडली आहे. पालघर लोकसभेचा निवडणुकीचा पाचव्या टप्प्यात समावेश होता. या मतदारसंघातील निवडणूक पार पडल्यानंतर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओचा आधार घेत विरोधकांनी मतदारसंघात भाजपने पैसे वाटल्याचा आरोप केला आहे. या व्हायरल व्हिडिओमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पालघर लोकसभा मतदारसंघातील विक्रमगड विधानसभेत मतदानाच्या आदल्या दिवशी रात्री पैसे वाटल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मतदारांना पैसे देऊन कमळाला मतं देण्यास सांगत असल्याचा व्हिडिओ कॅमेरात कैद झाला आहे. त्यानंतर पैसे वाटपाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओनंतर विरोधकांनी भाजपने विक्रमगडमध्ये मोठ्या प्रमाणावर पैसे वाटप केल्याचा आरोप केला आहे.

शरद पवार गटाच्या आमदाराने काय म्हटलं ?

पालघर विक्रमगड विधानसभेमध्ये भाजपकडून मतदानाच्या आदल्या दिवशी पैसे वाटपल्याचा आरोप आहे. प्रत्येक बूथवर अडीच लाख रुपये आणि प्रत्येक मतदारांना पाचशे रुपये भाजपने वाटले, असा आरोप विक्रमगड विधानसभेचे आमदार सुनील भुसारे यांनी केला आहे.

'विकास कामांवर विश्वास नसणाऱ्या भाजपा आणि मित्र पक्षाने पैशाने मत विकत घेण्याचा प्रकार केला आहे. याचा मी निषेध करत आहे. निवडणूक आयोग तथा जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करणार आहे. तसेच सखोल चौकशी करत कारवाईची मागणी करणार असल्याचं भूसारा यांनी सांगितलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Trend Shoes In India: शूजच्या या टॉप ब्रँडनी भारतीयांना घातलेय भूरळ, सध्या खूपच आहेत ट्रेंडिंगमध्ये

Marathi News Live Updates : पुण्यात भरधाव वेगात असलेल्या डंपरने घेतला तरुणीचा जीव

Ajit Pawar : भाऊबीजेची ओवाळणी मिळेल, पण लाडक्या भावाला विसरू नका; अजित पवार असं का म्हणाले?

Marathi Sahitya Samelan : मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी तारा भवाळकर

Chandrapur News : अवैध धंदे रोखण्यासाठी चकपिरंजी ग्रामसभेत अनोखा ठराव; शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी टाकली अट

SCROLL FOR NEXT