Palghar breaking news Saam TV
महाराष्ट्र

Palghar : पालघरमध्ये मोठी दुर्घटना! केमिकल कंपनीत भीषण स्फोट, दोन कामगारांचा मृत्यू, अनेक जखमी

राज्यात एकीकडे दिवाळीचा सण आनंदात साजरा केला जात असताना, दुसरीकडे पालघर जिल्ह्यात एक मोठी दुर्घटना घडली.

रुपेश पाटील. साम टीव्ही, पालघर

Palghar Chemical Company Explosion : राज्यात एकीकडे दिवाळीचा सण आनंदात साजरा केला जात असताना, दुसरीकडे पालघर (Palghar) जिल्ह्यात एक मोठी दुर्घटना घडली. पालघरमधील बोईसर तारापूर एमआयडीसीत भघेरिया केमिकल कंपनीत भीषण स्फोट झाला. या स्फोटात दोन कामगारांचा मृत्यू, तर १० हून अधिक कामगार जखमी झाले. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. (Latest Marathi News)

स्फोटाची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली असून बचावकार्य सुरू आहे. या भीषण स्फोटात जखमी झालेल्या कामगारांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

प्राप्त माहितीनुसार, भघेरिया केमिकल कंपनीत उत्पादन सुरू असताना, अचानक कंपनीतील बॉयलरचा भीषण स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की यामुळे जवळपासचा संपूर्ण परिसर हादरवून गेला.

दरम्यान, स्फोटाची माहिती मिळताच, अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. स्फोटात जखमी झालेल्या कामगारांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

 या स्फोटानंतर कंपनीत गॅस गळती देखील सुरू असून कोणालाही जवळ जाण्यापासून रोखण्यात आल्याची माहिती मिळत आहे. ऐन दिवाळीच्या सणात स्फोटामध्ये दोन कामगारांचा मृत्यू झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Donald Trump: वॉशिंगटनच्या हॉटेलमध्ये गोळीबाराचा थरार, डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, थरकाप उडवणारा VIDEO

Maharashtra News Live Update: जळगावात मंत्री गुलाबराव पाटील यांच्या मुलाचे भावी आमदार आशयाचे लागले बॅनर

Raigad Top 10 Places: उन्हाळ्याच्या सुट्टीत रायगडजवळील ही TOP 10 ठिकाणं नक्की पाहा, हिरव्यागार निसर्गात जाल हरवून

मुंबई-पुणे प्रवास होणार सुपरफास्ट! ‘मिसिंग लिंक’मुळे वेळेची मोठी बचत|VIDEO

Sunday Horoscope: सुर्यदेवाच्या कृपेने वाटेतले अडथळे होतील दूर, ५ राशींच्या व्यक्तींना अचानक होणार धनलाभ

SCROLL FOR NEXT