Pakistan street in Jalna! Partur Municipal Council's Mistake लक्ष्मण सोळुंके
महाराष्ट्र

Pakistan Galli : जालन्यात चक्क पाकिस्तान गल्ली! परतूर नगर परिषदेचा कारभार...

Pakistan Galli In Jalna : महाराष्ट्रातल्या भूमीत असलेल्या परिसराचं 'पाकिस्तान गल्ली'असं नामकरण केल्याने स्थानिक नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

लक्ष्मण सोळुंखे, साम टीव्ही जालना

जालना: सध्या देशासह राज्यात सध्या मंदिर, मस्जिद आणि भोंग्यावरुन राजकीय वातावरण तापलेलं आहे. असं असताना जालना (Jalna) जिल्ह्यातील परतूर (Parutr) शहरात चक्क पाकिस्तान गल्ली (Pakistan Galli) असल्याचं समोर आलं आहे. नगर परिषदेच्या वतीने मालमत्ता कर वसुलीसाठी करण्यात आलेल्या सर्वेदरम्यान पालिकेने हे नामकरण केल्याने पालिकेचा सुलतानी कारभार समोर आला आहे. शत्रुराष्ट्राविषयी विषयी नागरिकांत प्रचंड चीड असताना परतूर नगरपरिषेदेन भारतातल्या, त्यातल्या त्यात महाराष्ट्रातल्या भूमीत असलेल्या परिसराचं 'पाकिस्तान गल्ली'असं नामकरण केल्याने स्थानिक नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. (Pakistan street in Jalna! Partur Municipal Council's Mistake)

हे देखील पाहा -

जालना जिल्ह्यातील परतूर शहरात मालमत्ता कर आकारणीसाठी नुकताच सर्वे करण्यात आला. यात शहरातील अनेक मालमत्तांचे प्रत्यक्ष निरीक्षण करून त्यांना मालमत्ता करांच्या नोटीसा देण्यात आल्या. याप्रकरणी शहरात प्रचंड वादंग माजलेले आहे. असं असताना जुना मोंढा भागातील शनिमंदिर आणि प्रबुद्धनगर येथील काही रहिवाशांना 'पाकिस्तान गल्ली' असा पत्ता असलेली नोटीस दिली गेल्याने हा संपूर्ण प्रकार समोर आला आहे.

काँग्रेसचे माजी आमदार सुरेश जेथलिया यांचं वर्चस्व असलेल्या पालिकेच्या दस्ताऐवजात तसेच भाजपचे जालना जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते तथा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांच्या जिल्ह्यात पाकिस्तान केव्हा सामील झाला? असा प्रश्न नागरिक आता उपस्थित करत आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: शरीरसंबंध ठेवण्यासाठी खिडकीतून घरात घुसला, विरोध केल्याने सॉफ्टवेअर इंजिनीअरची हत्या

Gold Rate Today: सोनं रेकॉर्डब्रेक महागलं! प्रति तोळा इतकी झाली वाढ, वाचा २२ अन् २४ कॅरेटचे आजचे दर

Weekly Horoscope: या राशींच्या व्यक्तींनी आरोग्याची काळजी घ्यावी, जाणून घ्या राशीभविष्य

High Blood Pressure: रोजच्या धावपळीत ताण-थकवा येतोय; दुर्लक्ष करणं पडेल महागात, BPसोबत वाढतील 'या' समस्या

Maharashtra Live News Update : राज ठाकरे उद्या पुणे दौऱ्यावर

SCROLL FOR NEXT