जागा एक इच्छुक अनेक! राज्यसभेच्या एका जागेसाठी काँग्रेसमध्ये घोळ; गोंधळ सुटेना

Rajyasabha Seat In Maharashtra : दिल्लीतील नेत्यांची अजूनही महाराष्ट्रातील नेत्यांशी चर्चा झालेली नाही. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र कॉंग्रेसडून दिल्लीत जोर लावला जात आहे.
Confusion in Congress for one Rajya Sabha seat
Confusion in Congress for one Rajya Sabha seatSaam Tv

रश्मी पुराणिक

मुंबई: राज्यसभेच्या सहा जागा महाराष्ट्रातून भरल्या जाणार आहेत. या सहा जागांपैकी कॉंग्रेसकडून एक उमेदवार राज्यसभेवर (Rajyasabha Election) जाणार आहे. मात्र राज्यसभेच्या या एक जागेसाठीही काँग्रेसमध्ये (Congress) प्रचंड घोळ (Confusion) पाहायला मिळतोय. राज्यसभेच्या निवडणुकीसाठी आजपासून (मंगळवार) उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात झाली आहे. तरीही काँग्रेसमधील गोंधळ सुटता-सुटत नाहीये. राज्यसभेच्या एका जागेसाठी अनेक नेते इच्छुक असल्यानं हा घोळ निर्माण झाला आहे. (Confusion in Congress for one Rajya Sabha seat)

हे देखील पाहा -

एकीकडे राज्यसभेच्या निवडणुकीसाठी आजपासून अर्ज भरायला सुरुवात झाली आहे. मात्र दिल्लीतील नेत्यांची अजूनही महाराष्ट्रातील नेत्यांशी चर्चा झालेली नाही. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र कॉंग्रेसडून दिल्लीत जोर लावला जात आहे. त्याप्रमाणे दोन दिवस बैठकाही होणार आहेत. राज्यसभेसाठी मुंबईतून मिलिंद देवरा (Milind Deora), संजय निरुपम (Sanjay Nirupam) तर दिल्ली वर्तुळात गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad), मुकुल वासनिक (Mukul Wasnik), अविनाश पांडे (Avinash Pandey) या कॉंग्रेस नेत्यांच्या नावाची चर्चा आहे.

हे खासदार होणार निवृत्त

केंद्रीय निवडणुक आयोगाने महाराष्ट्रासह १५ राज्यातील राज्यसभेवर रिक्त होणाऱ्या ५७ खासदारांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यात महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहा जागांसाठी येत्या १० जून रोजी मतदान होणार आहे. राज्यसभेतून भाजपचे पीयूष गोयल, विनय सहस्त्रबुद्धे आणि विकास महात्मे तर शिवसेनेचे संजय राऊत, राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल आणि काँग्रेसचे पी. चिदंबरम असे सहा सदस्य ४ जुलै रोजी निवृत्त होत आहेत.

सख्याबळ

सध्या महाविकास आघाडीकडे १६९ आमदार आहेत. यात शिवसेनेचे ५५, राष्ट्रवादी ५४, काँग्रेस ४४, इतर पक्ष ८ आणि अपक्ष ८ असं महाविकास आघाडीकडे संख्याबळ आहे. तर भाजपकडे ११३ आमदारांचं संख्याबळ आहे. भाजपचे १०६ आमदार, रासप १, जनसुराज्य १ आणि अपक्ष ५ आमदार अशा एकूण ११३ आमदार भाजपकडे आहेत.

Confusion in Congress for one Rajya Sabha seat
मोठी बातमी! संभाजीराजेंना शिवसेनेची उमेदवारी नाहीच; सूत्रांची साम टीव्हीला माहिती

राज्यसभेच्या जागांचं गणित

राज्यसभेच्या एका जागेसाठी ४२ मतांची गरज असते. महाविकास आघाडीकडे १६९ आमदार आणि भाजपकडे ११३ आमदार आहेत. संख्याबळानुसार शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा एक उमेदवार सहज राज्यसभेवर निवडून जाऊ शकतो. तर भाजपचे दोन उमेदवार राज्यसभेवर जाऊ शकतात. तिसरी जागा भाजपनं लढवल्यास फोडाफोडी करावी लागू शकते.

Edited By - Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com