Relatives of the Paithan farmer mourning after he committed suicide during panchnama following alleged humiliation by revenue officials. Saam Tv
महाराष्ट्र

महसूल अधिकाऱ्यांच्या धमकीनंतर शेतकऱ्याची विहिरीत उडी; आत्महत्येने खळबळ

Paithan Tragedy: अतिवृष्टीने उद्ध्वस्त झालेला शेतकरी पंचनाम्याकडे डोळे लावून बसलाय.. तर पैठणमध्ये पंचनाम्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्यांच्या सुलतानी कारभाराने शेतकऱ्याचा बळी घेतलाय..

Omkar Sonawane

एकीकडे नापीकी, दुष्काळ आणि आता अतिवृष्टीने शेतकऱ्याच्या डोक्यावरचं आभाळ फाटलंय...शेतकरी कोलमडून पडलाय... त्याचा पंचनामा करणं तर सोडाच... उलट पैशासाठी ठेकेदारांशी साटंलोटं करुन शेतकऱ्यांनाच धमकावणारे अधिकाऱ्यांच्या रुपात महाराष्ट्रात जुलमी सुलतान तयार झालेत.... आणि अशाच पैठणच्या मंडळ अधिकाऱ्याच्या दमबाजीने उद्विग्न झालेल्या शेतकऱ्यानं अधिकाऱ्यासमोरच विहीरीत उडी घेत आत्महत्या केलीय...

खरंतर पैठणच्या खादगावमध्ये एका ठेकेदारानं खोदलेल्या नाल्याचं पाणी शेतात साचल्यानं पिकाचं नुकसान झालं.. त्यामुळे शेतकऱ्यानं शेतात येणारं नाल्याचं पाणी बंद करुन वाट करुन देण्याबाबत तक्रार दिली.. त्यानंतर मंडळाधिकारी पंचनामा करण्यासाठी गेले...मात्र तुझ्यावरच गुन्हा दाखल करु, अशी धमकी निगरगट्ट महसुल मंडळ अधिकारी शुभांगी शिंदे आणि तलाठी लक्ष्मीकांत गोजरेंनी शेतकरी संजय कोहकडेंना दिली. आणि त्यामुळे अपमान सहन न झाल्यानं पंचनामा सुरु असतानाच शेतकऱ्याने विहीरीत उडी घेत आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला..या प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचं आश्वासन महसुल मंत्र्यांनी दिलंय...

शेतकरी आत्महत्येचं प्रकरण फक्त संभाजीनगरमधील पैठणपुरतंच मर्यादित नाही... तर एकीकडे आसमानी संकटांची मालिका तर दुसरीकडे सावकारी कर्जाचा फास आणि असंवेदनशील अधिकाऱ्यामुळे आठ महिन्यात तब्बल 707 शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवलंय...

8 महिन्यांत 707 शेतकऱ्यांची आत्महत्या

जानेवारी - 88

फेब्रुवारी - 75

मार्च - 110

एप्रिल - 88

मे - 78

जून - 85

जुलै - 109

ऑगस्ट - 76

तर याच शेतकरी आत्महत्यांच्या मुद्द्यावरुन दोन दिवसांआधीच शरद पवारांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना खोचक टोला लगावला होता.

अतिवृष्टीमुळं सगळं काही गमावलेला शेतकरी अपमानित झाला असताना पंचनामे करुन त्याला दिलासा देण्याची जबाबदारी असलेले अधिकारीच पैशासाठी कसाई बनत असतील तर अशांवर कठोर कारवाईची गरज आहे. नाहीतर पुढच्या आठ महिन्यांत आणखी ७०० शेतकऱ्यांना आत्महत्या केल्याशिवाय पर्याय राहणार नाही...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident News : पुण्यात अपघाताचा भयानक थरार! भरधाव कार मेट्रो पिलरला धडकली, गाडीचा चक्काचूर

Ladki Bahin Yojana : फक्त १२ दिवस शिल्लक! आतापर्यंत फक्त ८० लाख लाडक्या बहिणींचे e-KYC पूर्ण; मुदत वाढवणार का? आदिती तटकरेंनी स्पष्टचं सांगितलं

Woman Physical Changes: प्रेग्नेसीनंतर स्त्रियांच्या शरीरात होतात हे ५ बदल, वेळीच घ्या काळजी

Local Body Election : शिंदेंच्या शिवसेनेचा भाजपला जोरदार धक्का, नंदुरबारमध्ये अनेकांनी कमळाची साथ सोडली

Maharashtra Live News Update: अहिल्यानगर शहरातील जैन समाजाची जमीन संग्राम जगताप यांनी हडप केल्याचा आरोप

SCROLL FOR NEXT