Former Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari during a public event amid political controversy over Padma Bhushan award. Saam Tv
महाराष्ट्र

कोश्यारींना पद्मभूषण, राज्यात तापलं राजकारण, फुले-शिवरायांचा अपमान करणाऱ्यांचा सन्मान का?

Padma Bhushan Koshyari Maharashtra Political Row: माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींवरून महाराष्ट्राचं राजकारण पुन्हा तापलंय. शिवराय आणि फुलेंबाबत वादग्रस्त विधान करणाऱ्या कोश्यारींवरून विरोधक का आक्रमक झाले आहेत? त्याला कोश्यारींनी नेमकं काय उत्तर दिलंय?

Suprim Maskar

तीन वर्षांपूर्वी याच विधानांमुळे महाराष्ट्रात तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारींविरोधात ठिकठिकाणी आंदोलनं झाली होती.... मात्र याचं कोश्यारींना केंद्र सरकारकडून पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला...आणि विरोधकांनी कडाडून आक्षेप घेतला.. महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांचा भाजपकडून सन्मान करण्यात आल्याची टीका राऊतांनी केली... तर खासदार सुप्रिया सुळेंनी वादग्रस्त विधानांच्या कटु आठवणी कायम असल्याचं म्हटलयं...

सत्ताधाऱ्यांनी मात्र या निर्णयाला विरोध करणाऱ्यांना छोट्या मनाचं म्हटलयं. इतकचं काय तर स्वत: कोश्यारींही विरोधकांना चांगलच प्रत्युत्तर दिलयं... माझी कोणी प्रशंसा करावी किंवा निंदा करावी म्हणून मी काम करत नाही, असा टोला कोश्यारींनी लगावलाय....

महाराष्ट्रात राज्यपाल पदावर असताना भगतसिंह कोश्यारी त्यांच्या वादग्रस्त भूमिकांमुळे आणि विधानांमुळे नेहमीच चर्चेत राहिले होते...आणि विरोधकांनी वेळोवेळी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली होती..12 विधानपरिषदेच्या जागांवर आणि मध्यरात्रीच्या शपथविधीवरून कोश्यारींचा कार्यकाळ वादग्रस्त ठरला होता... त्यानंतर कोश्यारींनी अचानक पदाचा राजीनामा दिल्यानंतर उलटसुलट चर्चांना उधाण आलं होतं. त्यामुळेच अशा कोश्यारींना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्यानं राज्याचं राजकारण नव्याने तापलंय... हा वाद अधिक चिघळणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Muslim reservation : मोठी बातमी! मुस्लिम समाजाचे आरक्षण रद्द, फडणवीस सरकारचा निर्णय

Chhatrapati Shivaji Maharaj: छत्रपती शिवाजी महाराज दाढी का ठेवायचे? जाणून घ्या कारणं

Maharashtra Live News Update: पुण्यात शिवजयंती निमित्त वाहतूक बदल, पर्यायी मार्ग वापरण्याचे पोलिसांचे आवाहन

Success Story: दोनदा UPSC क्रॅक; आधी IPS मग IAS; तिसऱ्यांदा लग्न करणारे IAS अवि प्रसाद आहे तरी कोण?

Gaming Jihad: दहशतवाद्यांचा 'गेमिंग' जिहाद; मुलांना कट्टरपंथी बनवण्याचा नवा डाव

SCROLL FOR NEXT