Osmanabad Corona Update SaamTv
महाराष्ट्र

Osmanabad Corona Update: उस्मानाबादकरांच्या चिंतेत भर, एकाच दिवसात 80 नवे रुग्ण

उस्मानाबाद जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत चालली आहे.

वृत्तसंस्था

कैलाश चौधरी, उस्मानाबाद

उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत चालली आहे. काल एकाच दिवशी तब्बल 80 कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात होती. उपाचाराखालील रुग्णसंख्याही एक अंकी होती (Osmanabad Corona Update 80 New Corona Cases Found In Last 24 Hours).

मात्र, जिल्ह्यात ओमिक्रॉनचा शिरकाव झाल्यानंतर प्रशासनाच्या वतीने कोरोना विषाणूच्या चाचण्या वाढवण्यात आल्या. त्यामुळे शुक्रवारचा दिवस उस्मानाबादकरांच्या चिंतेत भर घालणारा ठरला. शुक्रवारी रात्री मिळालेल्या अहवालानुसार तब्बल 80 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.

आता जिल्ह्यातील उपचाराखालील रुग्ण संख्या वाढली असून तब्बल 246 रुग्ण उपचार घेत आहेत. तर फक्त 8 रुग्णांना उपचाराअंती डिस्चार्ज देण्यात आला आहे.

राज्यात 40,925 नव्या रुग्णांची नोंद

गेल्या 24 तासात राज्यात 40,925 नव्या कोरोनाबाधित (Corona) रुग्णांची नोंद झाली आहे. तर 20 करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर हा 2.07 टक्के एवढा आहे. तसेच गेल्या 24 तासात 14,256 रुग्ण बरे झाले आहेत. आजपर्यंत राज्यात एकूण 65,47,410 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. सध्या राज्यातील राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 95.8 टक्के आहे. राज्यात 7,42,648 व्यक्ती होम क्वारांटाईन असून 1,463 व्यक्ती संस्थात्मक क्वारांटाईनमध्ये आहेत.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Loofah: प्लास्टिकचा लूफा वापरल्याने त्वचेवर काय परिणाम होतो?

Pune Crime : इंजिनीअरिंगमध्ये तीनवेळा नापास, नैराश्यात तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरुन थेट नदीत उडी

Maharashtra Politics: पहलगाममध्ये धर्म विचारून गोळ्या मारल्या, आणि ही लोक भाषा विचारून हिंदूंना चोपतायत- आशिष शेलार|VIDEO

Nitin Gadkari :...म्हणून जागतिक स्तरावर युद्ध पेटू शकते; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता

Classmates Bollywood Celebrities: एका शाळेत शिकलेत 'हे' बॉलिवूडचे फेमस सेलिब्रिटी

SCROLL FOR NEXT