''स्थानिक निवडणुकात वेगवेगळे लढलो नाही तर विरोधकांचा फायदा होईल'' साम टीव्ही
महाराष्ट्र

''स्थानिक निवडणुकांत वेगवेगळे लढलो नाही तर विरोधकांचा फायदा होईल''

पक्ष्याचा विस्तार वाढवणे सर्वांचा अधिकार आहे. महाविकास आघाडी सरकार बाबत नाना पटोले जे म्हणाले ते ऐकले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पक्ष्याचा विस्तार वाढवणे सर्वांचा अधिकार आहे. महाविकास आघाडी सरकार बाबत नाना पटोले जे म्हणाले ते ऐकले. पाच वर्षे आम्ही उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये राहणार पण स्थानिक निवडणूक स्वतंत्र लढणार हे प्रत्येकाचे आहे. कोल्हापूरला आम्ही आणि काँग्रेस एकत्र लढलो. जर आम्ही वेगवेगळे लढलो नाही तर विरोधकांचा फायदा होईल. म्हणून लढणे वेगवेगळे आणि निवडणुकी नंतर एकत्र येणे वेगळे. असे मत मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केले. ते सांगली मध्ये बोलत होते. 

ठीक आहे. गुन्हा नोंद झाला. पण अजित पवार कठोर प्रशासक आहेत. पण त्यांनी दिलगिरी व्यक्त केली होती. त्यांना पहिल्या पासून कोरोनाच्या काळात गर्दी आवडत नव्हती. लोक अचानक पने आले. पण त्यांनी कठोर भूमिका घेतली आहे. मात्र प्रताप सरनाईक यांच्या पत्रावर वर बोलणे हसन मुश्रीफ याने टाळले आहे.. 

मराठा समाज आरक्षण देणं हे राज्य सरकारच्या हातात राहिले नाही. तसेच आरक्षण देत असताना दोन्ही पक्ष्याने चुका केल्या आहेत. आम्ही पहिला प्रयत्न केला की आम्ही मागास आयोग न नेमता राणे समिती नेमली. ही आमची चुक होती. नंतर युती सरकार आल्यावर अधिकार नसताना कायदा पास केला. ही त्यांची चुक होती. त्यामुळे दोघांनी चुका केल्यानंतर मराठा समाजाने सहनशीलता किती सहन करायची. त्यामुळे दोघांनी मिळून आरक्षण मिळवून देणे गरजेचे आहे.

पश्चिम महाराष्ट्रामध्ये रुग्ण संख्या जास्त होती. पण राज्यात कोरोना संख्या कमी होत असताना या तिन्ही जिल्ह्यात रुग्ण वाढले होते. पण या महिना अखेर पर्यंत राज्यात जी परिस्थिती आहे. तशी या तिन्ही जिल्ह्यात होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Good News: आणखी एक वंदे भारत स्लीपर धावणार! २ महत्त्वाच्या शहरांना जोडणार; जाणून घ्या 'A टू Z' माहिती

Maharashtra News Live Update: खासदार ओमराजे निंबाळकर यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट

5 Best Kurti Sets for Women: महिलांसाठी स्टायलिश आणि ट्रेंडी कुर्ती सेट्स, लेटेस्ट 5 डिझाईन्स

October 2026 Bank Holidays : ऑक्टोबरमध्ये 12 दिवस बँका बंद; तुमच्या राज्यात किती दिवस बँका असणार बंद

Sachin Waze: मोठी बातमी! तब्बल साडेपाच वर्षांनी सचिन वाझे येणार तुरुंगाबाहेर; अँटिलिया स्फोटक प्रकरणी जामीन मंजूर

SCROLL FOR NEXT