Sharad Pawar, Uddhav Thackeray, and Raj Thackeray lead the ‘Satyacha Morcha’ against alleged voter fraud in Maharashtra. Saam Tv
महाराष्ट्र

आयोगाविरोधात विरोधकांची वज्रमूठ, ठाकरे-पवारांचा एकीचा नारा

Opposition’s Tight Fist Against Election Commission: व्होटचोरी, बोगस मतदाराच्या मुद्द्यावर विरोधकांनी एकीची वज्रमूठ आवळलीय... तर खुद्द शरद पवारांनी ठामपणे एकीचा नारा दिलाय.. मात्र विरोधकांनी सत्ताधारी आणि निवडणूक आयोगाची कशी कोंडी केलीय?

Bharat Mohalkar

विरोधकांनी व्होटचोरीच्या मुद्द्यावर एकीची वज्रमूठ आवळली.. आणि निवडणूक आयोगाविरोधात सत्याचा मोर्चा काढला... मात्र मोर्चासाठी विरोधकांनी आवळलेली मूठ मतचोरांच्या डोक्यात मारा, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी हल्लाबोल केलाय.. तर लोकशाही वाचवण्यासाठी सर्वांनाच पक्षीय भेद विसरुन एकत्र यावं लागेल, अशी ठाम भूमिका शरद पवारांनी घेतलीय..

दुसरीकडे विरोधी पक्षच नव्हे तर सत्ताधारी पक्षही मतदारयाद्याच्या घोळावर बोलत असताना आयोग दुर्लक्ष करतंय.. त्यामुळे ठाकरेंनी थेट मतदारयाद्या दुरुस्त होत नाहीत, तोपर्यंत निवडणूका घेऊ नका, अशा शब्दात निवडणूक आयोगाला ठणकावलंय... तर दुसरीकडे निवडणूक आयोगाचे लोक भाजपच्या मूक मोर्चाला जातात का? याकडे आमचं लक्ष असल्याचा खोचक टोला काँग्रेसने लगावलाय..

निवडणूक आयोगाविरोधात विरोधी विचारांचे पक्ष एकाच मंचावर आल्यानं शरद पवारांनी थेट संयुक्त महाराष्ट्र लढ्याची आठवण आल्याचं म्हटलंय.. सत्याच्या मोर्चाच्या मंचावर सर्व विरोधी पक्ष एकजुटीनं उभे असल्याचं चित्र दिसलं असलं तरी काँग्रेससारख्या प्रमुख विरोधी पक्षाचा मुंबई अध्यक्ष आणि प्रदेशाध्य़क्षानंच पाठ फिरवली होती.

त्यामुळे ऐन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर हातात तुतारी घेऊन क्रांतीची मशाल पेटणार का आणि रेल्वे इंजिन धावणार का? याकडे राज्याचं लक्ष लागलंय..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: महाडमध्ये मनसे पदाधिकाऱ्याला मारहाण

Onion Ban: कांदा न खाण्याची अनोखी परंपरा! भारतातील 'या' ठिकाणी कांदा खात नाहीत

Bihar Election : बिहारमध्ये भाजप सत्तेत येणार, शरद पवारांच्या आमदाराने सांगितले गणित

महिला विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यापूर्वी भयंकर घडलं; माजी क्रिकेटपटूचा अपघाती मृत्यू

Swara Bhaskar: 'सर मला फिल्ममध्ये...'; सलमान खानच्या 'या' चित्रपटात स्वरा भास्करला व्हायचं होत हिरोईन, पण निर्मात्याने...

SCROLL FOR NEXT