eknath shinde  saam tv
महाराष्ट्र

Eknath Shinde : एकनाथ शिंदेंनी ठाकरेंचे ६ खासदार फोडले कसे? कोणाला काय मिळणार? सगळं काही आले समोर

Eknath Shinde latest news : ठाकरे गटाचे ६ खासदार शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चांदरम्यान मोठी माहिती समोर आली आहे. विकासनिधी, २०२९ चे तिकीट आणि केंद्रीय मंत्रीपदाच्या आश्वासनांमुळे राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Namdeo Kumbhar

उद्धव ठाकरे याच्या शिवसेनेचे ६ खासदार सध्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असून, त्यांच्यात मोठी खलबतं सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या खासदारांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी मोठी आश्वासनं दिल्याचं समजतंय. ६ खासदार आज स्वतंत्र गट स्थापन करणार असून पुढील २ दिवसात शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. पण त्याआधी शिंदेंकडून खासदारांना मोठी आश्वासने देण्यात आली आहेत.

केंद्रीय मंत्रीपदाची ऑफर

संपर्कात असलेल्या ठाकरे गटाच्या खासदारांना त्यांच्या मतदारसंघात विकासकामांसाठी भरपूर निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासन एकनाथ शिंदे यांच्याकडून देण्यात आले आहे. सर्वात महत्त्वाची चर्चा म्हणजे, या खासदारांपैकी मराठवाड्यातील एका खासदाराला थेट केंद्रीय राज्यमंत्रीपद देण्याचे आश्वासन मिळाल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.

या खासदारांना केवळ निधीच नाही, तर आगामी २०२९ च्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा तिकीट देण्याचे आश्वासनही शिंदे यांच्याकडून देण्यात आले आहे. ठाकरे सेनेचे हे ६ खासदार शिंदे गटाच्या गळाला लागल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

६ खासदारांसह एकनाथ शिंदे आज अमित शाह यांची गुप्तपणे भेट घेणार?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीत गोपनीय रित्या भेट घेण्याची शक्यता आहे. या भेटीदरम्यान त्यांच्यासोबत ठाकरे गटाचे (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) ६ खासदार देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, शिंदे गटात प्रवेश करणाऱ्या ठाकरे गटाच्या ६ खासदारांपैकी एका खासदाराला थेट केंद्रीय राज्यमंत्रीपद दिले जाण्याची दाट शक्यता आहे.

ठाकरेंचे खासदार नाराज का?

पक्षनेतृत्वाकडून (उद्धव ठाकरे) अपेक्षित सहकार्य, पाठबळ आणि निधी मिळत नसल्याची तक्रार लोकप्रतिनिधी करत आहेत. तसेच स्थानिक पातळीवरील तक्रारींकडे आणि विकासकामांकडे दुर्लक्ष केले जात आहे. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे महाराष्ट्रात दौरे करत नसल्यामुळे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. दिल्लीच्या राजकीय वर्तुळात पक्षाची पुरेशी दखल घेतली जात नाही आणि निवडणुकांमध्ये पक्ष चौथ्या किंवा पाचव्या क्रमांकावर फेकला गेल्याची खंत खासदारांना आहे.

आमदार-नगरसेवकही फुटणार?

केवळ ६ ते ७ खासदारच नव्हे, तर ठाकरे गटाचे सुमारे १६ आमदार आणि ३८ नगरसेवक सुद्धा नाराज असून ते शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. येत्या १९ जून रोजी शिवसेनेचा ६० वा (हिरक महोत्सवी) वर्धापन दिन आणि बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. याच काळात ठाकरे गटाला हा मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. ही नाराजी दूर करण्यासाठी आणि फूट रोखण्यासाठी उद्धव ठाकरे ऑनलाईन बैठकीच्या माध्यमातून आपल्या लोकप्रतिनिधींशी संवाद साधत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Walking Benefits: रोज फक्त 30 मिनिटे चालण्याची सवय लावा अन् हेल्दी आयुष्याची सुरुवात करा

Sangli Waterfall: विकेंडला भिजण्याचा प्लान करताय? सांगलीत लपलाय हा एक धबधबा, नक्की फिरून या

Maharashtra News Live Update: अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे सप्तशृंग गड बंद; भाविकांना पायथ्याशीच करावी लागली नवसपूर्ती

अनधिकृत बाईक-टॅक्सी चालकांचे धाबे दणाणले, आता 'हे' प्रमाणपत्र अनिवार्य, परिवहन मंत्र्यांची मोठी घोषणा

घरच्या घरी करा पार्लरसारखा हेअर स्पा; केस दिसतील स्मूथ, सिल्की आणि शायनिंग

SCROLL FOR NEXT