Police Investigation in Amravati
Police Investigation in Amravati Saam Tv
महाराष्ट्र

अमरावतीत खळबळ! भरदिवसा गोळीबार, निशाणा चुकला आणि शाळकरी मुलीला लागला, नेमकं काय घडलं ?

साम टिव्ही ब्युरो

अमर घटारे

अमरावती : शहरात एका धक्कादायक घटनेमुळं खळबळ उडाली आहे. नागपूरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत (Amravati Crime) असणाऱ्या चारा बाजार परिसरात दोन गटात झालेल्या हाणामारीत भरदिवसा गोळीबार करण्यात आला. या चकमकीत (open Firing) एक तेरा वर्षीय शाळकरी विद्यार्थीनी जखमी झाली. अहमद खान असं गोळीबार करणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे. ज्या व्यक्तीवर गोळीबार करायचा होता (school student injured) त्याला गोळी न लागता रस्त्यावरुन जाणाऱ्या शाळकरी मुलीला गोळी लागली. या गंभीर घनेमुळं संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. या प्रकरणाचा नागपूर नागपुरी गेट पोलीस अधिक तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अमरावती शहरातील नागपूरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत पठाण चौक परिसरालगत असणाऱ्या चारा बाजार परिसरात दोन गटात हाणामारी होऊन गोळीबार झाला. या गोळीबारात तेरा वर्षीय शाळकरी विद्यार्थिनी जखमी झाल्यामुळे खळबळ उडाली आहे दिवसाढवळ्या झालेल्या गोळीबा घटनेमुळे अमरावती शहर पुन्हा एकदा हादरले.

जखमी मुलीवर अमरावती येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या तिची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. मात्र गोळीबाराच्या घटनेनंतर अमरावतीच्या पठाण चौकात पोलिसांचा तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.ज्या व्यक्तीवर गोळीबार करायचा होता त्याला गोळी न लागता रस्त्यावर जाणाऱ्या शाळकरी मुलीला गोळी लागली.

खासदार नवनीत राणा यांचा गंभीर आरोप

अमरावतीत घडलेल्या या धक्कादायक घटनेबाबत खासदार नवनीत राणा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दोन वर्षात अमरावतीत मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी वाढलीस आहे. आरती सिंग पोलीस आयुक्त झाल्या तेव्हापासून गुन्हेगारी वाढली.अमरावतीत विनापरवाना बंदुका आहेत. शहरात खुलेआम गुन्हेगारी वाढली. अमरावती पोलीस आयुक्त आरती सिंग प्रचंड भ्रष्टाचारी आहेत. अमरावती शहरात गुन्हेगारी वाढली त्याला पोलीस आयुक्त आरती सिंग जबाबदार आहेत. अमरावतीत खुलेआम गुन्हेगार फिरत आहे, मात्र पोलीस कारवाई करत नाही, असा गंभीर आरोप राणा यांनी केला आहे.

Edited By - Naresh Shende

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

The Great Indian Kapil Show बंद पडणार आहे का? अर्चना पूरण सिंहने व्हिडिओ शेअर करत सांगितलं सत्य

TVS Iqube EV ची वाढली मागणी, 32 लिटर स्टोरेज आणि 78 Kmph टॉप स्पीड; जाणून घ्या किती आहे किंमत

Mahadev Jankar: मरेन पण हाती कमळ, धनुष्यबाण घेणार नाही: महादेव जानकर

May Month Horoscope : 10 मे रोजी बुध मंगळ राशीत करणार प्रवेश, या राशीच्या लोकांना होणार धनलाभ

Baramati Lok Sabha: कमी मतदानाचा कोणाला मिळणार फायदा? खडकवासला ठरवणार बारामतीचा खासदार?

SCROLL FOR NEXT